March 23, 2026

वाळुज महानगर, (ता.11) – श्री हनुमान जगन्नाथराव भोंडवे पाटील हे एक नाव नसून वाळूज, पंढरपूर व बजाजनगर या परिसरातील व्यावसायिक, धार्मिक, शैक्षणिक, राजकीय, सामाजिक आणि औद्योगिक क्षेत्रातील एक अग्रीम नाव आहे. त्यांच्या 61 व्या अभिष्टचिंतन सोहळ्यांनीमित्त सद्गुरु श्री. वामनराव पै यांच्या विचारांनी प्रेरित झालेले व्याख्याते चंद्रकांत निंबाळकर यांचे ‘आदर्श पालक, आदर्श विद्यार्थी’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

बजाजनगर येथील भोंडवे पाटील पब्लिक स्कूल व ज्ञान भवन पब्लिक स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने भोंडवे पाटील शाळेच्या भव्य प्रांगणात झालेल्या या व्याख्यानात चंद्रकांत निंबाळकर यांनी मानवी जीवनातील दुःखाचे मूळ विचार प्रदूषण आहे. समाजामध्ये सर्व प्रकारचे प्रदुषण कमी करण्यासाठी दिव्य, सुंदर, शुभ, सकारात्मक विचाराचे प्रक्षेपण होणे आवश्यक आहे. सद्गुरु श्री. वामनराव पै यांनी निर्माण केलेल्या विश्वप्रार्थनेमध्ये सकारात्मक विचार हाच रामबाण उपाय आहे. अशा विचाराने अनेक कुटुंबे सुखी झालेली आहेत. जीवन विद्या मिशनच्या माध्यमातून चंद्रकांत निंबाळकर यांनी विद्यार्थी, शिक्षक, पालक व शिक्षकेतर कर्मचारी यांना आपल्या सकारात्मक विचाररुपी व्याख्यानाने मंत्रमुग्ध केले. व्याख्यानानंतर विद्यार्थी व पालकांनी विचारलेल्या शंकांचे शंकानिरसन देखील निंबाळकर यांनी केले.
व्याख्यानानंतर सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी भोजनाचा आस्वाद घेतला.

कार्यक्रमासाठी शाळेचे अध्यक्ष हनुमान भोंडवे, सचिव मीनाक्षीताई भोंडवे, महेश भोंडवे, मयुरी भोंडवे, चंद्रकांत निंबाळकर, वैशाली निंबाळकर, शाळेचे मुख्याध्यापक अविराज काळे, उपमुख्याध्यापिका शर्मिष्ठा दत्ता, प्राथमिक प्रमुखप्रमुख गेहना शादीजा, समन्वयक मंदाकिनी, वैभव पवार यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक, पालक तसेच शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रज्ञा सदाफुले व कविता भराडे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता ‘हे जग सुखी व्हावे’. या राज्यगीत व राष्ट्रगीताने झाली.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *