February 5, 2026

वाळुज महानगर, (ता.18) – बजाजनगर येथील भोंडवे पाटील शाळेत 51 व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्या हस्ते सोमवारी (ता.18) रोजी मोठ्या उत्साहात झाले.

या उद्घाटन प्रसंगी माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख, प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण, शिक्षणाधिकारी (योजना) श्रीमती भूमकर, उपशिक्षणाधिकारी अशोक पाटील, लाईक सोफी, संगीता साबळे, गटशिक्षणाधिकारी आराख, छत्रपती संभाजीनगर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी व्यंकट कोमटवार, भोंडवे पाटील शाळेचे अध्यक्ष हनुमान भोंडवे, मुख्याध्यापक रवी दाभाडे, समन्वयक राणी सावंत, गहना शादीजा आदी मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि त्यांच्यामधील संशोधन वृत्तीला वाव मिळावा म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. या विज्ञान प्रदर्शनात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नऊ तालुके व महानगरपालिका क्षेत्रातील तालुकास्तरावर निवड झालेले प्राथमिक विभागातील 30 विद्यार्थी व माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील 30 विद्यार्थ्यांनी आपापले प्रयोग मांडले. त्याचबरोबर प्राथमिक व माध्यमिक विभागातील विज्ञान व प्रयोगशाळा सहाय्यक यांचे निवडपात्र शैक्षणिक साहित्याचेही प्रदर्शन याठिकाणी आयोजित करण्यात आले. ‘समाज विकासासाठी विज्ञान’ अशी संकल्पना राबवत समाजातील विज्ञान व तंत्रज्ञानाचा विकास व्हावा यासाठी सुमारे तीन दिवस चालणारे हे प्रदर्शन खूप महत्त्वाची भूमिका पार पाडेल.
कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन तसेच पूर्वतयारीसाठी शिक्षण विस्तार अधिकारी डी.टी. सिरसाठ, जे.व्ही. चौरे, भोंडवे पाटील शाळेचे मुख्याध्यापक रवी दाभाडे व शाळेतील शिक्षक तसेच विद्यार्थी देखील परिश्रम घेत आहेत. शाळेचे अध्यक्ष हनुमान भोंडवे यांनी या उपक्रमातून चांगले वैज्ञानिक घडावेत अशी अपेक्षा व्यक्त करत सर्वांना शुभेच्छा दिल्या.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *