March 23, 2026


वाळूज महानगर, (ता.3)- बजाजनगर येथील भोंडवे पाटील शाळेत स्त्रीशिक्षणाचा पुरस्कार करणाऱ्या महामाऊली सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला मुक्तीदिन म्हणून साजरी करण्यात आली. सकाळच्या विशेष परिपाठात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी तिसरीतील विद्यार्थ्यांनी या परिपाठात सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित भाषणे, प्रश्नमंजुषा, नृत्य सादर करून सर्वांना प्रभावित केले. त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई यांच्या जीवनातील प्रसंगावर आधारित नाटकात महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा करून तत्कालीन शिक्षणाची प्रतिकूल परिस्थिती सर्वांसमोर मांडून उपस्थितांची मने जिंकली.
याप्रसंगी शाळेचे अध्यक्ष हनुमान भोंडवे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की; सावित्रीबाई फुले या भारतीय समाज सुधारक, शिक्षण तज्ज्ञ आणि कवयित्री होत्या. अत्यंत सधन कुटुंबातील हे दांपत्य सुखी जीवन जगू शकत होते; परंतु त्यांनी तसे न करता स्त्री शिक्षणासाठी व समाजात सुधारणा घडवून आणण्यासाठी ब्रिटिश राजवटीत भारतीय महिलांना हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. कार्यक्रमास मुख्याध्यापक रवी दाभाडे, उपमुख्याध्यापिका शर्मिष्ठा दत्त, समन्वयक राणी सावंत, समन्वयक गहेना शादीजा, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *