March 22, 2026


वाळुज महानगर, (ता.) – निरोगी समुदायाचा पाठपुरावा करण्यासाठी तसेच विद्यार्थी व शिक्षकांमध्ये आरोग्यविषयक चेतना वाढवण्यासाठी बजाजनगर येथील भोंडवे पाटील शाळेत 26 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान उत्साहवर्धक योग सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.


शाळेचे संचालक हनुमान भोंडवे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. मुंबई येथील योगगुरू प्रवीण बांदकर त्यांच्या कुशल शिष्यांसह कु. श्रुती शिंदे, कु. गायत्री शेट्टे आणि प्रसाद महामुनकर यांना या सत्रांचे नेतृत्व करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. या योग शिबिरात योगगुरु प्रवीण बांदकर यांनी आपल्या रसाळ वाणीतून योगासने व प्राणायाम यांचे महत्त्व प्रात्यक्षिकांसह आपल्या शब्दात अधोरेखित केले.

भोंडवे पाटील पब्लिक स्कूलमध्ये आयोजित या विशेष सप्ताहात अध्यक्ष हनुमान भोंडवे, मुख्याध्यापक अविराज काळे, उपमुख्याध्यापिका शर्मिष्ठा दत्ता, मिडल स्कूल प्रमुख राणी सावंत, प्राथमिक विभाग प्रमुख गहेना शादिजा यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी या योग सत्रात सक्रियतेने व अतिउत्साहाने सहभाग घेतला.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *