वाळूजमहानगर (ता.13) – भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी सप्लाय चेन म्हणजेच पुरवठा साखळी मधील आव्हानांचे संधीत रूपांतर केले पाहिजे. तसेच पारंपारिक संसाधनाबरोबरच आधुनिक संसाधनांचा वापर करणे गरजेचे आहे. त्यामध्ये इंटरनेट ऑफ थिंग्स डिजिटल सप्लाय चेन मॅनेजमेंट आर्टिफिशियल इंटेलिजन्स आदी तंत्रज्ञानाचा वापर करत पुरवठा साखळीला मजबूत करावे लागेल तसेच स्थानिक संसाधनांचा वापर करत आंतरराष्ट्रीय आव्हानांचा सामना करावा लागेल. असा सूर परिषदेत मान्यवरांकडून व्यक्त करण्यात आला.
औरंगाबाद विभागातर्फे तसेच मॅजिक आयआयएम मराठवाडा ऑटो क्लस्टर यांच्या साह्याने आयोजित ग्लोबल ऑटोमोटिव्ह सप्लाय चेन चॅलेंजेस अँड अपॉर्च्युनिटीज इन रिचिंग टू वर्ड्स आत्मनिर्भर भारत या विषयावरील आयोजित दोन दिवसीय परिषदेचा समारोप गुरुवारी (ता.10) रोजी झाला. परिषदेच्या दुसऱ्या दिवशी वाहन क्षेत्रातील पुरवठा साखळी कशी मजबूत तसेच आत्मनिर्भर करता येईल. या विषयावर तज्ञांचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्रात अल्टरचे राजेश कृष्णन टीसीएसचे अरुण कुमार संपत, एस एन पाणीग्रही, नितीन आठवले, सुमंत बरवा, प्राध्यापक सुश्मिता गंध आदी तज्ञ सहभागी झाले होते. परिषदेच्या दुसऱ्या दिवशी इंडियन टेक्नॉलॉजीचे संजय संघाई, वेक्टर इंजीनियरिंग सोल्युशन्सचे नरहरी वाघ, इंडुरान्स टेक्नॉलॉजीचे गिरीश कोकणे, संजय टेक्नो प्लास्टचे व्यवस्थापकीय संचालक प्रसाद कोकीळ, अल्टरचे राजेश कृष्णन, ग्राइंड मास्टरच्या संचालिका मोहिनी केळकर, अरुण कुमार संपत आदी मान्यवरांनी पुरवठा साखळी नियोजन या विषयावर मार्गदर्शन केले. परिषदेचा समारोप बागला ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक ऋषी कुमार बागला यांच्या उपस्थितीत झाला. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन औरंगाबादचे सचिव पवन चौधरी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एस ए ई इंडियाचे के वेंकटराज, संजय निबंध, मॅजिकचे संचालक आशिष गर्दे, समन्वयक रवी खारुल, रमेश पसरिया, नरहरी वाघ, डॉ.उल्हास शिंदे, डॉ. उल्हास शिवूरकर, पवन चौधरी, सागर मुरुगकर, ओंकार देशपांडे, राजेंद्र मुदखेडकर, सुदर्शन धारूरकर, चेतन सगर, धनंजय नरमाला, आय आय एम चे सर्व सदस्य यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी छत्रपती शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच देवगिरी इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून उपस्थित होते.