March 23, 2026

वाळुज महानगर, (ता.1) – भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा उपाध्यक्षपदी लांझी येथील तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष जनार्दन अंबादास गांधीले पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष संजय खंबायते व भाजपा किसान मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष एल जी गायकवाड यांनी ही नियुक्ती केली.


या नियुक्तीबद्दल जनार्दन गांधीले पाटील यांचे
गंगापूर खुलताबाद तालुक्याचे आमदार प्रशांत बंब, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य किशोर धनायत, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक नंदकुमार गांधीले पाटील, गंगापूर तालुकाध्यक्ष सुरेश शिंदे, भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे माझी तालुकाध्यक्ष बाबासाहेब शिंदे, अशोक हिवाळे, अमोल शिंदे, सचिन मुंडे, अशोक काकडे, नामदेव इले, गणेश सुरडकर, रामेश्वर गवळी, धोंडीराम होले, नंदू जगताप, रामदास आलोणे, मोहन सोनवणे, शंकर पारधे, श्रीराम बोचरे, चेतन बोरुले, किरण श्रीखंडे, अविनाश गायकवाड, रुपेश नाडे, सुरज बत्तीशे, नंदकिशोर भवार, रामेश्वर नाईक, नामदेव कुटे, नंदू आढाव, संदीप भवार आदींनी स्वागत करून शुभेच्छा दिल्या आहेत.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *