March 23, 2026

वाळुज महानगर, (ता.9) – घराला कुलूप लावून बजाजनगर येथे मुलाच्या शाळेत गेलेल्या कुटुंबाच्या घरी अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून लाखो रुपयांचा सोन्या चांदीचा ऐवज लंपास केला. ही चोरीची घटना सोमवारी (ता.8) रोजी दुपारी घडली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, गुलाबराव साहेबराव आडे वय – 39 वर्षे, कुटुंबासह गट नं 52/1 फ्लॅट नं. के -11, वडगाव (को.) बजाजनगर ता.जि. छत्रपती संभाजीनगर येथे राहतात. ते वाळूज औद्योगिक वसाहतीतील संकाज इंजिनिअरींग, साजापुर या कंपनीत क्वालिटी इंजिनिअरींग म्हणून काम करतात. सोमवारी (ता.8) रोजी दुपारी 11.45 वाजेच्या सुमारास गुलाबराव आडे हे घराला लॉक लावुन मुलाच्या शाळेमध्ये पॅरेंट्स मिटींग असल्याने बजाजनगर येथे गेले होते. दुपारी 12.30 वाजेच्या दरम्यान मिटिंग संपल्याने घरी आले असता घराचे लॉक दिसुन आले नाही. घराची कडी मात्र लावलेली होती. त्यानंतर आत जावुन पाहीले असता लोखंडी कपाटाचा दरवाजा उघडा दिसला त्यावरुन संशय आल्याने कपाट तपासुन पाहीले असता आतील कप्यात ठेवलेले सोन्याचे दागीने दिसुन आले नाही. सोन्याचे दागीन्यांचा कपाटात व घरात इतरत्र शोध घेतला परंतु ते मला मिळुन आले नाही. यावरुन खात्री झाली की, कोणीतरी अज्ञात चोरट्याने घरात येउन चोरी केली आहे. चोरीस गेलेल्या सोन्याचे दागीन्याचे वर्णन असे, 1 लाख 12 हजार रुपये किमतीचे 4 तोळे वजनाचे सोन्याचा हार, 56 हजार रुपये किमतीचे 2 तोळे वजनाचे सोन्याची चेन, 11 हजार 200 रुपये किमतीचे 4 ग्रॅम वजनाचे सोन्याची पिळ्याची अंगठी, 19 हजार 600 रुपये किमतीचे 7 ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातले वेल व बाळी, 1 हजार रुपये किमतीचे 2 तोळे वजनाचे चांदिचे गोफ, 2 हजार 800 रुपये किमतीचे 1 ग्रॅम वजनाची सोन्याची सुई. असा लाखो रुपये किमतीचे सोन्या चांदिचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी गुलाबराव आडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे करीत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *