
वाळूज महानगर, ((ता.13) – महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ केंद्र बजाजनगच्या संघाने भजन स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर गटात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे. यामुळे या भजन संघाची राज्यस्तरीय भजन स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे बुधवार 8 ऑक्टोबर रोजी ललित कला भवन उस्मानपुरा येथे पुरुष व महिलांसाठी भव्य भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत 13 संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेत का क केंद्र बजाजनगरच्या संघाने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले. यामुळे हा संघ का क तर्फे नियोजित राज्यस्तरीय भजन स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. बक्षीस वितरणप्रसंगी हेडगेवार रुग्णालयाचे मानव संसाधन अधिकारी रविंद्र कोल्हारकर, स्टर लाईट इंडियाचे मुख्य मानव संसाधन विभाग प्रमुख रोहित पाटील, प्रभारी सहाय्यक कल्याण आयुक्त भालचंद्र जगदाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. भजनी संघाला का क बजाजनगर केंद्र निरीक्षक दिनकर पाटील यांनी मार्गदर्शन केले. संघात रामेश्वर शिंदे (संघ प्रमुख ), संजय सोमवंशी, ज्ञानेश्वर पिंपळे, सुनील तौर, विजय निकम, गणेश कोलते, कैलास शिंदे, सुदर्शन जायकर, सुदाम वाघ, श्रीधर रोकडे, तुकाराम थोरात, भागवत गोराडे आदींचा सहभाग होता.
