February 5, 2026


वाळूजमहानगर, (ता.29) – भगवान महावीर स्कूल बजाजनगर, येथे 74 वा प्रजसत्ताक दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी सर्वात वैशिष्ट्यपूर्ण, नयनरम्य असा महाराष्ट्राची संतपरंपरा हा देखावा वारीच्या मध्यामतून दाखवला. ज्यात विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांच्या रुपात पावली खेळत, रिंगणाचा सोहळा विठ्ठल हरी नामाचा जयघोष करत अवघे पंढरपूरच निर्माण केले. संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर, एकनाथ, जनाबाई, मुक्ताबाई असे प्रमुख संत दाखवले गेले. त्यामुळे बजाजनगर येथील भगवान महावीर स्कूल मध्ये जणू काही पंढरीच अवतरली असे भासत होते.

यावेळी जयांट्स ग्रुप ऑफ चिकलठाणाच्या सेक्रेटरी डिंपल पागरिया कार्यक्रमाचे अध्यक्ष तर भाजपा शहर महिला अध्यक्ष भारतीय जैन संघटनेच्या केंद्रस्तरीय स्मार्ट गर्ल ट्रेनर मनिषा भन्साली या प्रमुख पाहुण्या म्हणून लाभल्या.

प्रथम शाळेतील विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली. शाळेतील इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांनी एरोबिक्स ड्रिल सादर करून व्यायामाचे महत्त्व सांगितले. तर शाळेतील सेमी मध्यामतील विद्यार्थ्यांनी लेझिम प्रकारांचे आकर्षक, तालबद्ध सादरीकरण करत भारताला मिळालेल्या G-20परिषदेच्या प्रतिनिधित्व साठी सुंदर असे G -20 चे चिन्ह तयार केले. तसेच सायकल चालवत रोमांचकारी स्टंट करून दाखवले.

यावेळी पाण्याचे नियोजन – महत्व, मोबाईलचे दुष्परिणाम, मानवता एक धर्म ,शिस्त अशा विविध रंगी विषयांवर विद्यार्थ्यांनी आपले मत मांडले. तर उपस्थित मनिषा भन्साली, डिंपल पगरिया, संस्थेचे सचिव पारस चोरडिया, संभाजी राचुरे यांनी ही मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काकडे संगीता आणि शाळेतील विद्यार्थिनी कु. डिंपल चंदन व ऋतजा चव्हाण यांनी केले.
कार्यक्रमाचे नियोजन शाळेच्या मु. अ. कल्याणी सांगोले यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी चोपडे करुणा, कामळे विशाल, प्रियांका अमिलकंठवार, महाजन वर्षा, मैलारे अल्का, शास्त्री अनिता, यांनी परिश्रम घेतले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *