February 5, 2026


वाळूज महानगर, (ता.30) – छोटा हत्तीतून भंगार चोरून नेणार्या 6 जणांना एमआयडीसी वाळूज पोलीसांनी अटक करून त्याच्या ताब्यातून 2 लाख 65 हजार रुपये किमतीचा ऐवज शनिवारी (ता.28) रोजी जप्त करण्यात आला.

वाळूज औद्योगिक वसाहतीतील मराठवाडा कपंनीजवळून काही महिला व पुरूष छोट्या हत्तीमध्ये चोरीचे लोखंडी सामान घेऊन जात असल्याची माहिती वाळुज एमआयडीसी पोलिसांना मिळाताच पोउपनि दिपक रोठे, पोना सुरज अग्रवाल, धिरज काबलिये, हनुमान ठाके मराठवाडा कपंनीजवळ एक टाटा एस अ‍ॅपे (एमएम16,एई -827) तपासली. त्याअ‍ॅपे मध्ये चालक अजित शेख व पाठीमागे चार महिला दिसुन आल्या. त्यातील सामानातील कागपत्राची मागणी केली असता कागदपत्र नसल्याने त्याच्या ताब्यातुन 2 लाख 60 हजार रुपये किमतीचा छोटा हत्ती, 15 हजार रुपये किमतीचे लोखंडी सामान जप्त करण्यात आले. शनिवारी (ता.28) रोजी रात्री 11 वाजता करण्यात आलेल्या या कारवाई प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात
आरोपी अजित सलीम शेख रा.विटावा, छाया अशोक डुकरे, अनिता आण्णासाहेब फुलारी, रुपाली सोनाजी जाधव हे तीघे रा. सिडको वाळूज महानगर, यशोदा झगडू चव्हाण रा. हिनानगर चिकलठाणा, मुजीब रहमान शेख रा.विटावा यांच्याविरुद्ध
गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *