
वाळूजमहानगर, (ता.20) – वाळूज औद्योगिक परिसरातील विटावा शिवारात एका भंगारच्या गोडाऊनच्या मोकळ्या जागेत ठेवलेल्या प्लास्टिकच्या साहित्याला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. बुधवारी (ता.20) रोजी दुपारी लागलेल्या या आगीत सुदैवाने कोणतीही जीवित आली झाली नाही आगीचे कारण मात्र अद्यापही अस्पष्ट आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, वाळूज औद्योगिक वसाहतीतील इटावा शिवारात गट नंबर 19 मध्ये पाल कंपनीच्या मागील बाजूस सय्यद मजहर याच्या मालकीचे सय्यद ट्रेडर्स नावाने स्क्रॅप गोडाऊन आहे. या गोडाऊनच्या मोकळ्या प्लॉटमध्ये मोठ्या प्रमाणात स्क्रॅप साठवून ठेवलेले होते. त्यामध्ये प्लास्टिक मटेरियल, लाकडी प्लायवूड, लोखंडी अँगल, केमिकल, ऑईलयुक्त ड्रम असे साहित्य ठेवलेले होते. बुधवारी ता 20 रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास या गोडाऊनच्या मोकळ्या जागेला आग लागली. प्लास्टिक ऑइल युक्त ड्रम लाकडी साहित्य मोठ्या प्रमाणात असल्याने आग मोठ्या प्रमाणावर भडकली. दुपारी दीड वाजेच्या सुमार्स लागलेल्या या आगीची माहिती नुकताच वाळूज अग्निशमन दलाचे पी के चौधरी, के टी सूर्यवंशी, एन एस कुमावत, एसडी उपरे पाटील, डी एन चंद यांनी एका बंबाच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला.
सायंकाळी पाच वाजता ही आग नियंत्रणात आली. यात लाखोंचा ऐवज जळून खाक झाला. मात्र सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात या आगीच्या घटनेची नोंद करण्यात आली आहे.
