वाळूजमहानगर, ता.22 – माझी गाडी खराब झाली आहे. सिडको गार्डनकडे या असे म्हणून बोलावून घेऊन बॅट व चाकूने मारहाण करून गंभीर जखमी केले. 10 डिसेंबर 2024 रात्री 8:45 वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेप्रकरणी घटस्फोटीत पत्नीसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, राहुल दिलीप खराडे (वय 32), रा. सितानगर, बजाजनगर ता. जि. छत्रपती संभाजीनगर यांची घटस्फोटीत पत्नी पल्लवी दिनेश काशिद रा. चौधरी भुवी नर्मदा अपार्टमेंट सिडको वाळुज हिने 10 डिसेंबर 2024 रात्री 8:45 वाजेच्या सुमारास खराडे यांना फोन करून माझी गाडी खराब झाली आहे. असे म्हणून सिडको गार्डनजवळ बोलावल्याने खराडे हे तिकडे जात असताना सिडको गार्डनजवळच तीन अनोळखी इसमांनी पाठीमागून गाडीवर येवून आवाज देत गाडी थांबवुन खराडे यांना बेसबॉलच्या बॅटने मारहाण केली व चाकुने मारुन गंभीर जखमी केले. या प्रकरणी राहुल खराडे यांच्या फिर्यादीवरून वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अनोळखी तीन इसमा व घटस्फोटीत पत्नी पल्लवी दिनेश काशिद यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.