
वाळूज महानगर, (ता.23) – रांजणगाव (शेणपुंजी) येथे पत्त्यावर पैसे लावून बुग्गी नावाचा जुगार खेळताना मिळून आल्याने पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य जप्त केले. ही कारवाई 21 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4.30 वाजेच्या सुमारास वाळूज एमआयडीसी पोलिसांनी केली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कमळापुर फाटा, हिंदुस्तान किराणाजवळ रांजणगांव (शेणपुंजी) येथे आरोपी अनुप पिंपळे रा. पंढरपुर व दत्तु मच्छिंद्र थोरात वय 18 वर्ष, रा. साक्षी लॉन्सजवळ राजनगाव (शेणपुंजी) ता. गंगापूर. हे सार्वजनीक ठिकाणी बुग्गी नावाचा जुगार बदक छाप पत्ते व पैशाने खेळवत असतांना 21 सप्टेंबर रोजी 4.30 वाजेच्या सुमारास मिळून आले. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून रोख 400 रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले. याप्रकरणी पोलीस अंमलदार हनुमान अण्णासाहेब ठोके यांच्या फिर्यादीवरून वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपी गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस हवालदार शिवाजी वाडेकर करत आहे.
ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश आघाव, पोनि. गणेश ताठे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि गौतम वावळे, पोउपनि दिपक रोठे, धीरज काबलिये, सुरेश भिसे, यशवंत गोबाडे, नितीन इनामे, सुरेश कचे, सुरज अग्रवाल, हनुमान ठोके यांनी केली.
