
वाळूज महानगर – वाळूज औद्योगिक वसाहतीतील मे बाळकृष्ण इंडस्ट्रीज लि. (बीकेटी) या कंपनीमध्ये 7 नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात कंपनीचे अधिकारी, कर्मचारी व कामगार अशा 270 जणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. या कंपनीत गेल्या 18 वर्षापासून कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अरविंद पोद्यार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सतत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येत आहे.
सध्याच्या धावपळीच्या जगात रोड अपघात, मलेरीया, हिमोफिलीया, थायलेसीमिया, डेंगु अशा अनेक आजारा सारख्या संकंटांना सामोरे जावे लागत आहे. सध्या दिवाळीच्या सुट्टया असल्याने त्यात अधिकच भर पडत आहे. परिणामी अनेकांना प्राण गमवावे लागतात. अशावेळी रक्ताची गरज असते. मात्र रक्तपेढीमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत आहे व रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक यांना रक्त मिळविण्यासाठी खुप अडचणी येत आहेत. या अडचणी दूर व्हाव्यात म्हणून वाळुज औद्योगिक वसाहतीतील मे. बाळकृष्ण इंडस्ट्रीज लि. ही कंपनी नेहमीच सामाजीक बांधीलकी जपत असते. या कंपनीतील कामगार कर्मचारी तसेच मे. बाळकृष्ण टायर्स संघटना हे सातत्याने मागील 18 वर्षापासुन कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अरविंद पोद्यार यांचा वाढदिवस रक्तदान करून साजरा करतात. त्याचाच एक भाग म्हणून कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अरविंद पोद्दार यांच्या वाढदिवसाचे औचीत्य साधुन शुक्रवारी 7 नाव्हेंबर 2025 रोजी रक्तदान शिबीर आयोजित केले होते. या शिबीरात 270 कामगार व कर्मचाऱ्यांनी उत्सफुर्तपणे रक्तदान केले.

या कार्यक्रमाचे उदघाटन कंपनीचे युनीट हेड स्वप्नील व्यास यांनी रिबीन कापुन केले. याप्रसंगी कंपनीचे युनीट हेड स्वप्नील व्यास, अजय गुप्ता, पियुष सोनी, बी. एस. पाठक, बाळकृष्ण टायर्सचे कामगार आर. पी. बनसोड, व्ही. एम. पाठक, प्रविण आमारा, के. शशीधरण, मुकेश गुप्ता, आबासाहेब वाघमारे, चंद्रकांत भालेराव, सुशील झाल्टे, अभय राय, विजय जैन, बी. बी. निकम, मंगेश तांबडे, व्हि. एम. कस्तुरे यांच्यासह इतर कामगार आणि कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कामगार संघटनेचे अध्यक्ष के. एच. शिंदे, एस. जी. राठोड, एन. बि. शिंदे, एस. डी. गोरे, सुनिल, बि. बि. जाधव, बि. एल. गाडे, आर. व्ही. भुतकर आदींनी विशेष परिश्रम केले. वैद्यकीय महाविद्यालयाच्या विभागीय रक्तपेढी (घाटी हॉस्पीटल) यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरात रक्तपेढीचे अधिकारी डॉ. गुलफाम, डॉ. विदया व जनसंपर्क अधिकारी सुनिता बनकर आदींनी रक्त संकलन केले.
