वाळूजमहानगर, ता.9 – सध्या अनेक रक्तपिढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने सामाजिक बांधिलकी म्हणून वाळूज औद्योगिक वसाहतीतील मे बाळकृष्ण इंडस्ट्रीज लिमिटेड (बीकेटी) या कंपनीच्या वतीने शुक्रवारी (ता.8) रोजी घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात कामगार व कर्मचारी मिळून 227 जणांनी उत्स्फूर्त रक्तदान केले.
सध्याच्या धावपळीच्या जगात रोड अपघात, मलेरीया, हिमोफिलीया, थायलेसीमिया, डेंगु अशा अनेक आजारांमुळे रक्तपेढीमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. परिणामी रुग्ण व रूग्णांचे नातेवाईक यांना रक्त मिळविण्यासाठी खुप अडचणी येत आहेत. त्यामुळे सामाजिक बांधिलकी म्हणून वाळूज औद्योगिक वसाहतीतील मे. बाळकृष्ण इंडस्ट्रीज लि. ही कंपनी नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत असते. या कंपनीतील कामगार, कर्मचारी तसेच मे. बाळकृष्ण टायर्स संघटना हे सातत्याने मागील 17 वर्षापासुन कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अरविंद पोद्यार यांचा वाढदिवस रक्तदान करून साजरा करतात. त्यामुळे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अरविंद पोद्दार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन शुक्रवारी (ता.8) नाव्हेंबर रोजी रक्तदान शिबीर आयोजित केले होते. यात 227 कामगार व कर्मचाऱ्यांनी या शिबीरात उत्सफुर्त पणे रक्तदान केले. या कार्यक्रमाचे उद्घाटन कंपनीचे युनीट हेड स्वप्नील व्यास यांनी रिबीन कापुन केले.
या कार्यक्रमास कंपनीचे युनीट हेड, वरिष्ठ व्यवस्थापन व बाळकृष्ण टायर्स कामगार संघटनेचे अध्यक्ष बि. बि. जाधव, उपाध्यक्ष के. एच. शिंदे, सचिव आर. पी. बनसोड तसेच संघटनेचे इतर पदाधिकारी एस. जी. राठोड, बि. एल. गाडे, एन. बि. शिंदे, एस. डी. गोरे, सुनिल मेरड व आर. व्ही. भुतकर यांच्यासह कंपनीतील कामगार आणि कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कंपनीचे बी. एस. पाठक, आबासाहेब वाघमारे, चंद्रकांत भालेराव, खालेद खान, सुशील झाल्टे, बी. बी. निकम, मंगेश तांबडे, अजय राय, व्हि. एम. कस्तुरे यांनी विशेष परिश्रम केले. वैद्यकीय महाविद्यालयाच्या विभागीय रक्तपेढीच्या (घाटी हॉस्पीटल) यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरात डॉ. गुलफाम, डॉ. विद्या, जनसंपर्क अधिकारी सुनिता बनकर आदींनी रक्त संकलन केले.