March 23, 2026

बिडकिन, (ता.10) :- बिडकीन येथील शेकटा रोडवरील स्क्रँप गोडाउनला शुक्रवारी (ता.10) रोजी सायंकाली 7 वाजेच्या सुमारास भिषण आग लागली असुन आगीत लाखोंचे नुकसान झाले आहे. आगीचे कारण मात्र समजू शकले नाही.

बिडकीन येथील शेकटा रोडवरील गट नंबर 82/83 येथे असलेल्या खाजगी गोडाऊनला शुक्रवारी (ता.10) रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास भिषण आग लागली. या आगीत मोठ्या प्रमाणावर स्क्रँप जळून खाक झाले आहे.
घटनास्थळी बिडकिन पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरिक्षक गणेश सुरवसे, पोलिस उप निरीक्षक महेश घुगे, सहायक फौजदार तानगडे, कर्मचारी आदींनी धाव घेतली. अग्निशामक दल व खाजगी टॅकरच्या मदतीने आग विझविण्याचे काम चालू आहे. शेकटा रोडवरील अल्फा वेअर हाऊसचे हे गोडाऊन असल्याचे सांगितले जाते. यात लाखो रुपयाचा ऐवज जळून खाक झाला. अद्याप पर्यंत आगीचे कारण समजले नाही.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *