February 5, 2026


वाळूजमहानगर (ता.05) – बजाजनगर येथील इंद्रप्रस्थ कॉलनी मधील प्लॉट नंबर एक्स 147 येथे बियर बार, परमिट रूम सुरू करण्यात येत आहे. त्यास परवानगी देऊ नये. या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते जगन्नाथ कोळी यांच्यासह नागरिकांनी बुधवारी (ता.1) रोजी पासून आमरण उपोषण सुरू केले आहे.

बजाजनगर येथील इंद्रप्रस्थ कॉलनीत प्लॉट नंबर एक्स 147 दिशा कॉम्प्लेक्स येथे बियर बार, परमिट रूम सुरू करण्यात येत आहे. जवळच शिवछत्रपती विद्यालय असून, शाळेत जाणाऱ्या प्रवेशद्वार व नियोजित बियर बारचे प्रवेशद्वार यामध्ये केवळ पन्नास मीटर अंतर आहे. तसेच समोर नागरी वसाहत आहे. त्यामुळे आर एक्स 147 या ठिकाणी बियर बार ला परवानगी देऊ नये. तसे झाल्यास येथे मद्यपीचा परिसरातील नागरिक व महिलांना मोठ्या प्रमाणात त्रास होईल, सामाजिक शांतता व कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे या बिअर बार, परमिटला परवानगी देऊ नये. या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते जगन्नाथ कोळी, नागेश शिंदे, संदीप बहादुरे, चंद्रकांत शितोळे, सविता शितोळे, शिला शिंदे, अलका गाडे, सुप्रिया कोतलवाड, शकुंतला जायभाय, विष्णू मोतीगे,धीरज बहादुरे, संभाजी शेवाळे यांच्यासह नागरिक व महिलांनी बुधवारी (ता.1) पासून इंद्रप्रस्थ कॉलनी येथे आमरण उपोषण सुरू केले आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *