February 5, 2026

बिअरचा टेम्पो नाल्यात, अत्यंत गजबजलेल्या चौकात घडली घटनावाळुज महानगर, (ता.26) – बिअर शॉप मध्ये डिलिव्हरी देण्यासाठी आलेला बियरचा टेम्पो चक्क धापे तोडून नाल्यात कलंडला. मात्र सुदैवाने हा टेम्पो पलटी झाला नाही. नसता मोठी दुर्घटना घडली असti. ही घटना बजाजनगर येथील अत्यंत गजबजलेल्या महाराणा प्रताप चौकात शुक्रवारी 26 डिसेंबर रोजी दुपारी घडली.

बजाजनगर येथील महाराणा प्रताप चौक हा अत्यंत गजबजलेला परिसर आहे. या परिसरात मोठी बाजारपेठ असून येथे सर्वच प्रकारच्या दुकानांचा समावेश आहे. त्यात बियर शॉपीची संख्याही मोठी आहे. शुक्रवारी 26 डिसेंबर रोजी दुपारी बिअरची डिलिव्हरी देण्यासाठी टेम्पो (एमएच 04, जी आर- 9492) आला. तो महाराणा प्रताप चौकातील एका बियर शॉपी समोर उभा केला जात असतानाच नाल्यावरील ढापे निखळून टेम्पो नाल्यात कलंडला. सुदैवाने हा टेम्पो उलटला नाही. नसता आतील मालासह ग्राहकांच्या जीवितास धोका होऊन मोठी दुर्घटना घडली असती. या घटनेनंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली. दरम्यान क्रेनच्या सहाय्याने टेम्पो सरळ करून पुढील कामकाज सुरू झाल्याने ग्राहकांचा आणि येजा करणाऱ्यांचा जीव भांड्यात पडला.
————————

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *