March 23, 2026

वाळूजमहानगर, (ता.24) – मुलांचे शिकवणी वर्ग घेऊन कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका बावीस वर्षीय तरुण विद्यार्थ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. वाळूज औद्योगिक परिसरातील रांजणगाव शेणपुंजी येथे घडलेली ही घटना शुक्रवारी (ता.24) रोजी सकाळी 7.15 वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

वाळूज परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) येथील छत्रपतीनगर येथील श्रीकृष्ण बंडू राठोड वय 22 हा परिसरातील मुलांचे शिकवणी वर्ग घेऊन कॉलेजमध्ये शिकत होता. त्याने राहत्या घरात ओढणी सारख्या कपड्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (ता.24) रोजी सकाळी 7.15 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. त्यास बेशुद्धावस्थेत बंडू कनीराम राठोड यांनी उपचारार्थ घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून 9.30 वाजेच्या सुमारास मयत घोषित केले. या प्रकरणी घाटीतून ए आर खिल्लारे यांनी दिलेल्या माहितीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल रामचंद्र बिघोत करीत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *