February 5, 2026

वाळूजमहानगर, (ता.14) – भानामती, छुछा, जादूटोणा करणाऱ्या एका मांत्रिकाने स्वतःच्या बावीस वर्षीय मुलीची निर्घुण हत्या केली. विशेष म्हणजे त्याने स्वतःच्या मुलीचा मृतदेह स्वतःच्याच किचन घरात पुरून ठेवला. अत्यंत घ्रणास्पद असलेला हा प्रकार गुरुवारी (ता.14) रोजी दुपारी उघडकीस आला. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

वाळूज येथील समता कॉलनीत सूर्यकांत शेळके यांचे दुमजली घर आहे. दहा खोल्या असलेल्या या घराच्या दोन खोल्यांमध्ये काकासाहेब नामदेव भुईगळ हा तांत्रिक पत्नी व दोन मुलीसह राहत होता. या मांत्रिकाने स्वतःच्या 22 वर्षीय मुलीची निर्घुण हत्या केली. व मृतदेह किचन रूम मधील सिलेंडर ठेवण्याच्या जागेवर पुरला. सुमारे तीन महिन्यापूर्वी ही घटना घडली असावी, ती गुरुवारी (ता.14) रोजी दुपारी उघडकीस आली

 

विशेष म्हणजे घाण वास येऊ नये, म्हणून या मांत्रिकाने मृतदेह पुरण्यासाठी मिठाचा वापर केला. गेल्या अनेक दिवसापासून खोली बंद आहे, शिवाय खोलीत राहणारा बेपत्ता आहे, फोन घेत नाही. म्हणून घर मालकाने त्याच्या घराचे कुलूप तोडले असता हा खळबळ जनक प्रकार उघडकीस आला.

 

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त दीपक गिर्हे, वाळूज पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन इंगोले, वाळूज पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विनायक शेळके, पोलीस उपनिरीक्षक सखाराम दिलवाले, पोलीस अंमलदार गणेश लक्कस यांच्यासह फॉरेंसिक लँबच्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रुबीना शेख व अमोल कायमोडे यांनी धाव घेत आरोपीचा माग शोधण्याचा प्रयत्न केला. ज्ञान मयत मुलीचा मृतदेह खाजगी रुग्णवाहिकेतून घाटीत दाखल करण्यात आला या प्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *