
वाळुज महानगर, (ता.17) – शिवसैनिकांचे आराध्य दैवत, श्रद्धास्थान वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे बजाजनगर शाखेच्या वतीने बजाजनगर येथील कोलगेट चौक येथे सोमवारी 17 नोव्हेंबर सकाळी 10 वाजता अभिवादनपर श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी उपजिल्हाप्रमुख अरविंद धिवर, तालुकाप्रमुख बिश्नोई जाधव, बजाजनगर शहरप्रमुख विशाल खंडागळे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रम प्रसंगी मनोगत व्यक्त करताना शहरप्रमुख विशाल खंडागळे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला. तर उपजिल्हाप्रमुख अरविंद धिवर यांनी त्यांच्या जीवनात शिवसेना प्रमुख यांची अविस्मरणीय भेट सांगितली. यावेळेस बोलताना निष्ठावंत शिवसैनिक म्हणून शेवटपर्यंत समाजकार्य करत राहणार आणि शिवसेनाप्रमुखांनी दिलेला मूलमंत्र जपणार. अशी ग्वाही देत येणाऱ्या काळात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकामध्ये छत्रपती संभाजीनगर पश्चिम मध्ये शिवसेनेचा भगवा फडकवू आणि तिचं खरी श्रद्धांजली ठरेल असे म्हटले. यावेळी युवासेनेचे तालुका अधिकारी विजय वाडेकर, माजी ग्रामपंचायत सदस्य काकाजी जीवरग, बजरंग पाटील, विभागप्रमुख विनोद दाभाडे, सुनील गोरे, रतन नलावडे, रोहिदास चव्हाण, नरसिंग ढगे, उपविभागीय प्रमुख लहू खराटे, बाळासाहेब शिंदे, श्रीनिवास मराठे, विकास गवळी, अभि पवळे, संशोधन सावते आदींची उपस्थिती होती.
