वाळूजमहानगर, (ता.17 – मराठवाडा साहित्य संमेलनात रविवारी (ता. 16) रोजी प्रसिद्ध साहित्यिक गेणू शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बालकुमार मेळावा प्रचंड उत्साहात झाला. ‘या कोवळ्या कळ्या माजी लपले रवींद्र शिवाजी!’ विकसता सामाजी प्रकटतील महापुरुष!!’ या ग्रामगीतेतील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ओवीची जणू प्रचितीच आली. हा मेळावा बाल साहित्यिकांच्या भन्नाट रचनांनी प्रचंड गाजला आणि या बाल साहित्यिकांची शब्द संपत्ती ऐकून उपस्थित जेष्ठ रसिकांनी भरभरून दाद दिली.
बजाजनगरातील दगडोजीराव देशमुख महाविद्यालयात 44 व्या मराठवाडा साहित्य संमेलनात रविवारी (ता.16) रोजी बालकुमार मेळावा उत्साहात झाला. या मेळाव्यात अनेक बाल साहित्यिकांनी आपल्या कविता सादर करून उपस्थित जेष्ठ रसिकांना मंत्रमुग्ध केले. मेळाव्याचे सूत्रसंचालन बालकवी गणेश घुले यांनी केले. श्री गुरुदेव सेवाश्रम ग्रामगीता अध्ययन केंद्र येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचारपीठावर झालेल्या या बाल मेळाव्या तेप्रसंगी बाल साहित्यकार श्रीपती जमाले, निशा कापडिया, विनोद सिनकर, संजय ऐलवाड, ललिता शिंदे, किरण निकम, संगीता देशमुख, आनंद पपूलवाड, भारती सोळुंके, प्रदीप इक्कर, अविनाश सोनटक्के, आदी बाल साहित्यिकांची विचारपीठावर उपस्थिती होती. या संमेलनापूर्वी झालेल्या आंतर शालेय काव्यवाचन स्पर्धेत वाळूज महानगरातील विविध शाळेतील तब्बल 65 बालकवींनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत बजाजनगर येथील भैरोमल तनवाणी शाळेची विद्यार्थिनी कुमारी शांभवी भट हिने प्रथम पारितोषिक पटकाविले होते. या बालमेळाव्यात कु.पूजा बागुल, कु.श्रावणी वडजे, कु. नंदिनी थोरात, कु. अनुष्का राऊत यांच्यासह अनेक बाल कवियत्रींनी कविता सादर केल्या. मेळाव्याप्रसंगी कवी संजय वरकड, बाल साहित्यकार वीरभद्र मिरेवाड (नांदेड) शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष आशा डांगे, मराठवाडा साहित्य परिषदेचे सचिव गणेश मोहिते, कुंडलिकराव अतकरे संमेलनाचे स्वागताध्यक्ष विजय राऊत, मच्छिंद्र सोनवणे, श्री गुरुदेव सेवा मंडळ मराठवाडा प्रांत सेवा अधिकारी मनीष जैस्वाल, विठ्ठल कांबळे, पंचायत समितीच्या माजी सभापती धनश्री कांबळे, श्री गुरुदेव महिला मंडळाच्या अध्यक्षा रेखा हिंगणकर, श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सचिव राजाभाऊ देशमुख, संचालक गजानन मानकर, नरेश देशकर, भानुदास पळसकर, ज्ञानेश्वर धुर्वे, प्रमोद देशमुख, ज्ञानेश्वर दरेकर, केशवराव बुले, प्रमोद नाल्हे, विजय रोडे, गणेश पळसकर, संजय लव्हाळे, वैशाली गवई, डॉ.नीलिमा काळे, संजय वैष्णव यांच्यासह श्री गुरुदेव सेवा मंडळ बजाजनगरचे पदाधिकारी व सेवक तसेच बाल साहित्य रसिक व पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.