March 23, 2026


वाळूजमहानगर, (ता.9) – समाजात रूढ झालेली बालविवाहाची प्रथा रोखण्यासाठी वाळुज परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) येथील न्यू शहीद भगतसिंग विद्यालयातील मुख्याध्यापिकेसह सर्व महिला, पुरुष शिक्षक व विद्यार्थ्यांनी बालविवाह रोखण्यासाठी काम करण्याची प्रतिज्ञा केली. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या या प्रतिज्ञातून समाजासाठी हा एक अनोखा संदेश बुधवारी (ता.8) रोजी देण्यात आला.

न्यू शहीद भगतसिंह विद्यालय रांजणगाव (शेणपुंजी) येथे जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिला शिक्षिका व सेविका यांच्या सन्मानाचे आयोजन करण्यात आले होते. प्रथम शाळेच्या मुख्याध्यापिका भारती साळुंके व सर्व महिला शिक्षिका यांनी राष्ट्रमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर यांचे प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण करून जिजाऊ गाईड पथकाच्या वतीने सर्व महिला शिक्षकांचे औक्षण करण्यात आले. यावेळी बालविवाह रोखण्याची सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी प्रतिज्ञा केली. तसेच पुरुष शिक्षकांच्या वतीने संस्थाध्यक्षा तथा शाळेच्या मुख्याध्यापिका भारती साळुंके यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला तसेच सर्व महिला शिक्षिका व सेविका यांचा देखील पुरुष शिक्षकांच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला.

 

यावेळी सत्कारमूर्ती भारती साळुंके यांनी विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन करताना स्री ही दोन कुळांचा उद्धार करत असते तसेच ती आई, बायको, बहीण, मुलगी अशा अनेक रूपात आपली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत असते. स्री कुठेही मागे राहू नये, मागे राहता कामा नये यासाठी मी कायमस्वरूपी प्रयत्नशील राहील असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाहेद पठाण, प्रास्ताविक आप्पासाहेब मिसाळ तर आभार जगदीश दिघे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विजय वाकचौरे, सागर लाड, स्वप्निल शेळके, इस्माईल शेख आदींसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *