
वाळुज महानगर, (ता.20) – तळपिंप्री येथील
राष्ट्रमाता जिजाऊ इंग्लिश स्कुलची विद्यार्थिनी गंगापूर येथील धुत कन्या विद्यालयात बारावीची परीक्षा देण्यासाठी गेली असता तिचे कोणीतरी अज्ञात आरोपीने अज्ञात करण्यासाठी अपहरण केले. ही घटना 29 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, तळपिंपरी येथील आश्विनी तोगे वय 17 वर्ष 8 महीने ही राष्ट्रमाता जिजाऊ इंग्लिश स्कुल तळपिंप्री या शाळेत 12 वी मध्ये शिक्षण घेते. सध्या 12 वी ची परिक्षा सुरु असुन तिला गंगापुर येथील धुत कन्या विद्यालय येथे परिक्षा सेंटर मिळाले आहे. ती पेपर देण्यासाठी दररोज गंगापुर येथे जात होती. 29 फेब्रुवारी रोजी सकाळी 8.30 वाजता वडिलांनी तिला कोडापुर झांजर्डे येथून गंगापुर जाणाऱ्या बसमध्ये बसुन दिले. अंदाजे दुपारी अडीच वाजेच्या सुमारास तीने कोणाच्यातरी फोनवरून सांगितले की, मी एसटी बसने घरी येत आहे. म्हणुन वडील हरसुली फाटा येथे मुलीस घेण्यासाठी येऊन थांबले. दुपारी 3.30 ते 4 वाजेच्या सुमारास बस आली तेव्हा त्या बसमधून मुलगी आश्विनी ही उतरली नाही. म्हणून ज्या नंबरवरून फोन आला होता. त्या नंबरवर फोन लावला असता त्याने सांगितले की, माझा मोबाईल घेऊन तुम्हास फोन लावला होता. त्यानंतर मला काही माहीत नाही असे सांगितले. मुलगी घरी आली नाही. म्हणून वडिलांनी गंगापुर येथे मुलीचा शोध घेतला व इतर नातेवाईकाना फोन करून विचारपुस केली असता मुलगी आश्विनी ही मिळुन आली नाही. तिस कोणीतरी अज्ञात आरोपीने अज्ञात कारणासाठी पळवुन नेल्याची शंका आल्याने वडिलांच्या खबरीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.
तीचे वर्णन खालीलप्रमाणे-
आश्विनी छबु तोगे वय-17 वर्ष 8 महिने रा. औरंगपुर (हरसुली) ता. गंगापुर जि. छत्रपती संभाजीनगर, रंग- सावळा, उंची 5 फुट अंदाजे, बांधा सडपातळ, भाषा- मराठी बोलते, शिक्षण-12 वी वर्गात शिकते, अंगात – पंजाबी ड्रेस पायात, काळ्या रंगाची सैंडल.
