March 27, 2026


वाळूज महानगर (ता.8) – खेळता खेळता हातरुमाल विद्युत वाहिनेला अडकल्याने तो काढण्यासाठी केलेल्या एका 14 वर्षीय मुलाला विजेचा शॉक लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. ही घटना वडगाव कोल्हाटी गट नंबर येथे शुक्रवारी 7 नोव्हेंबर रोजी सकाळी वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, सौरभ अभिमान नागरे रा. नायगाव- बकवालनगर असे मयत मुलाचे नाव आहे. त्याचे आई वडील दोघे वडगाव गट नंबर 70 येथे गवंडी काम करतात. त्यामुळे वडीलासोबत सौरभ सुद्धा बांधकामाच्या ठिकाणी जात असे. शुक्रवारी कंपनीच्या दोन मजली शॉपचे काम सुरू होते. त्यावेळी सौरभ हा वरच्या रुममध्ये एकटाच खेळ होता. या रूमच्या जवळूनच विद्युत तारा गेलेल्या. तेथे खेळता खेळता सौरभचा रुमाल हा प्रवाहीत तारामध्ये अडकल्याने तो काढण्याचा प्रयत्न करत असतांना त्याला शॉक लागून तो गंभीर जखमी झाला. त्यास बेशुध्द अवस्थेत घाटीत दाखल केले असता डॉक्टारांनी तपासुन सौरभ यास मृत घोषीत केले. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *