February 5, 2026

 


वाळुज महानगर, (ता.14) – रांजणगाव (शेणपुंजी) येथील बसवंतराव पाटील इंग्लिश स्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान, स्वातंत्र्यसैनिक आणि बालकांचे लाडके पंडित जवाहरलाल नेहरू (चाचा) यांची जयंती शुक्रवारी 14 नोव्हेंबर रोजी मोठ्या आनंदमय वातावरणात साजरी करण्यात आली. बालदिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

कार्यक्रमची सुरुवात 1 लीतील शोल्क शिंदे याच्या गाण्यातून झाली. त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष आय. जी. जाधव, श्री गजानन विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका सुरेखा बसवदे, संस्थेचे सचिव हरीश जाधव, बसवंतराव पाटील इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक भाऊसाहेब शिरसाठ आणि प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका रेखा बिदरकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व पंडित नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.
यावेळी रेखा बिदरकर यांनी पंडित नेहरूंचे जीवनकार्य, त्यांची देशभक्ती, आधुनिक भारत घडविण्यातील त्यांचे विशेष योगदान, तसेच मुलांप्रती असलेले त्यांचे प्रेम याविषयी सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, “पंडित नेहरू यांचा विश्वास होता की, देशाची खरी ताकद मुलांमध्ये आहे. त्यांचे बालपण सुरक्षित असेल तर राष्ट्र उज्ज्वल होईल,” हा संदेश विद्यार्थ्यांनी आचरणात आणण्याची गरज आहे. यानंतर विद्यार्थ्यांनी नेहरूंवरील विचार, कविता, भाषण व बालदिनानिमित्त कार्यक्रम सादर केले.
यावेळी देवांश पंजावळे, रविराज दिवटे हे विद्यार्थी जहरलाल नेहरू यांच्या वेशभूषेत तर आर्मीच्या गणवेशात श्रावणी वाघमारे होती.
पहिलीतील- अरुण शिंदे, श्रद्धा राठोड, भक्ती काळे, स्वराज सरकटे, आर्यन कुमार, वैदेही तवर, दुसारीतील – आराध्या म्हैसमाले, सम्यक तुपे, तिसरीतील – प्रांजल शेजवळ, चौथीतील – आर्यन प्रसाद, पाचवीतील- समृद्धी कांबळे, वेदांत लोंढे,
सहवीतील – गरिमा धोटे, जानवी नवसारे, स्वामिनी उदमल्ले आदींनी वेशभूषा केली होती.

कार्यक्रमात सोनी कुमारी, पूजा ठाकूर, प्रतिभा मुंढे, छाया पंडित, तेजल देवकर, कल्पना निकाळजे, पूजा खोतकर, सुरेखा शिंदे, अस्मिता तायडे, ममता खोतकर, दीक्षा बोपचे, वर्षा घुले, विनया पत्की, सुरेखा शिंदे, तेजोराव तलवारे संभाजी शेवटे, शेख असद लता वैष्णव, अविनाश ठाणगे, हर्षदा भोंबे यांचा समावेश होता. रेखा बिदरकर यांनी नियोजन केलेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. पूजा खोतकर आणि आभार प्रतिभा मुंडे यांनी मानले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *