March 23, 2026


वाळुज महानगर, (ता.27) – रांजणगाव (शेणपुंजी) येथील बसवंतराव पाटील इंग्लिश स्कूलमध्ये शहिद भगतसिंग यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे अध्यक्ष आय.जी. जाधव, श्री गजानन विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका सुरेखा बसवदे, संस्थेचे सचिव हरीश जाधव. श्री गजानन माध्यमिक विद्यामंदिरचे मुखाध्यापक हनुमान सर, बसवंतराव पाटिल माध्यमिक इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक भाऊसाहेब शिरसाठ, प्राथमिक मुख्याध्यापिका रेखा बीदरकर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दिप प्रज्वलन करून करण्यात आली.
याप्रसंगी पूजा खोतकर यानी शहीद भगतसिंग यांच्या संघर्ष जीवन चरित्रावर विद्यार्थ्याना महिती
दिली. यावेळी इयत्ता पहिलीतील सारा खान, श्रद्धा राठोड, कृष्णा भोपाळे. संप्यक तुपे. इयत्ता 3 री तील – शोर्या कळसकर, शुभी कुशवाह, इयत्ता 4 थी मधील – श्रद्धा सोने. आर्यन प्रसाद, आर्यन परिहार. इयत्ता 5 वी तील – वेदांत लोंढे, श्रुती सोनटक्के. इयत्ता 6 वी मधील – वैष्णवी गोड्रे, शुभ्रा खंदारे, अदिबा शेख, आयेशा शाह या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर गजानन माध्यमिकचे मुखाध्यापक हनुमान सर शहीद भगतसिंग यांचे देशप्रेम त्यांचा त्याग या विषय सखोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला सोनी कुमारी, पूजा ठाकूर, प्रतिभा मुंढे, छाया पंडित, तेजल देवकर, कल्पना निकाळजे, पूजा खोतकर, सुरेखा शिंदे, अस्मिता तायडे, ममता खोतकर, दीक्षा बोपचे, अस्मिता तायडे, वर्षा घुले, विनया पत्की आदींची उपस्थिती. रेखा बिदरकर यांनी नियोजन केलेल्या या याकार्यक्रमाचे सूत्रसंचल पूजा खोतकर यांनी केले. तर आभार सोनी कुमारी यांनी मानले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *