वाळूजमहानगर, ता.9- रांजणगाव (शेणपुंजी) येथील बसवंतराव पाटील प्राथमिक व माध्यमिक इंग्लिश स्कूल, गरवारे समुदायिक केंद्र बाल भवन, सिडको वाळुज एमआयडीसी, छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेत बसंतराव पाटील प्राथमिक व माध्यमिक इंग्लिश स्कूल या शाळेतील इयत्ता 5,6,7 वीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.
यशसंपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये स्वराज सोनटक्के, प्रियांशू खाडे, श्रीकांत वाघमारे, रक्षित भंडारे, अभिषेक मोहिते, सुजाता शिंदे, कपिल टिपराले, आरव बारहाते, सायली यादव, संचिता सोनवणे, अंश प्रसाद यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे संस्थेचे अध्यक्ष आय.जी.जाधव, संस्थेचे सचिव हरीश जाधव, गजानन प्राथमिक विद्यामंदिरच्या मुख्ध्यापिका सुरेखा बस्वदे, बसवंतराव पाटील इंग्लिश स्कूल माध्यमिक मुख्याध्यापक भाऊसाहेब शिरसाट, प्राथमिक मुख्याध्यापिका रेखा बिदरकर, विजयाक्रांती पवार, आणि बसंतराव पाटील इंग्लिश स्कूलचे तलवारे सर यांचे मार्गदर्शन लाभले.