
वाळुज महानगर (ता.29) :- वाळूज औद्योगिक वसाहतीतील बजाज कंपनीच्या संरक्षण भिंतीवरून आत प्रवेश करून चोरीचा प्रयत्न करणाऱ्या एका आरोपीस सुरक्षा रक्षकाने पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. हा प्रकार शुक्रवारी (ता.28) रोजी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास उघडकीस आला. 
याबाबत मिळालेली माहिती अशी की, शुक्रवारी (ता.28) रोजी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास वाळूज औद्योगिक वसाहतीतील बजाज कंपनीमध्ये एक मुलगा कॉपर केबल चोरी करत असताना दिसुन आल्याने कंपनीचे सुरक्षा रक्षक तेथे गेले असता त्यांना पाहून तो पळुन जात असताना सुरक्षारक्षकांनी त्यास पकडले. व त्यास त्याचे नाव पत्ता वितारले असता वैभव संतोष गोटे वय 23 वर्ष रा. गणेश वसाहत रांजणगाव (शेणपुंजी) ता गंगापुर जि. छत्रपती संभाजीनगर असे सांगितले. त्यानंतर सुरक्षारक्षकांनी त्याला वाळूज एमआयडीसी पोलीसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी प्रशांत रवींद्र पाटील यांच्या फिर्यादीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात कलम 379, 511 भादंवि. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
