
वाळूजमहानगर, ता.2) – वाळूज औद्योगिक वसाहतीतील बजाज अॅटो कंपनी व बजाज ऑटो एम्प्लॉईज युनियन यांच्यात पगार वाढीचा करार होऊन कामगारांना 17 हजार 500 रुपयांची वेतनवाढ मिळाली आहे. हा करार पुढील साडेतीन वर्षासाठी असणार असून तो 1 फेब्रुवारी 2025 पासुन लागु करण्यात आला आहे़. दरम्यान ही पगार वाढ तीन टप्प्यात करण्यात आली असून पहिल्या वर्षी 50 टक्के व पुढील दोन वर्ष 25- 25 टक्के अशी आहे.

कंपनी व्यवस्थापन व युनियनच्या पदाधिकाऱ्यात हा करार यशस्वी झाल्यानंतर कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर कामगारांची सभा झाली. या सभेत पगारवाढीच्या कराराची माहिती कामगारांना देण्यात आली.
त्यानुसार बजाज ऑटो कंपनी व्यवस्थापन व बजाज ऑटो एम्प्लॉइज युनियन यांच्यात झालेल्या मागील वेतन वाढीचा करार संपुष्ठात आल्याने पगार वाढीचा नवीन करार 28 फेब्रुवारी रोजी करण्यात आला.
या करारानुसार कामगारांना 17 हजार 500 रुपये वेतनवाढ देण्यात आली आहे. या वेतनवाढीच्याच्या करार प्रसंगी कंपनी व्यवस्थानाचे उपाध्यक्ष अभय पत्की, बाबासाहेब वालतुरे, सपोर्ट सर्व्हिसचे एन.आर पाटील, पर्सनल मॅनेजर सचिन थाले तसेच बजाज ऑटो एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष तात्यासाहेब पवार, सचिव ज्ञानेश्वर भोरगीर, कार्याध्यक्ष विजय पवार, उपाध्यक्ष उध्दव करडखेले, शाशिकांत देशपांडे, कोषाध्यक्ष प्रभु चव्हाण, सहसचिव सत्यविजय देशमुख, रमेश कोकीळ, सहकोषाध्यक्ष देवलिंग झाडबुके, शॉप प्रतिनिधी कौतिक मिरगे, योगेश बोरोले आदीची उपस्थिती होती.
युनियनचे सहसचिव रमेश कोकीळ यांनी या सभेचे प्रास्ताविक करून सूत्रसंचालन केले. तर सहसचिव सत्यविजय देशमुख यांनी आभार मानले.
पुढील साडेतीन वर्षासाठी असलेला हा पगारवाढीचा करार करण्यात आला. यात भरघोश 17 हजार 500 रुपयाची पगारवाढ मिळाली. दरम्यान ही पगारवाढ तीन टप्प्यात करण्यात आली असून पहिल्या वर्षी (1 फेब्रुवारी 2025) 50 टक्के, दुसऱ्या वर्षी (1 फेब्रुवारी 2026) 25 टक्के व तिसऱ्या वर्षी (1 फेब्रुवारी 2027 ते 1 जुलै 2028) – 25 टक्के अशी आहे. या पगार वाढीच्या करारामुळे कामगारांना 82 हजार ते 85 हजार रुपये पगार मिळणार आहे.
