February 5, 2026

वाळूजमहानगर, (ता.24) – “जीवन भराची साथ जीवनानंतर मदतीचा हात” असेल तर ती म्हणजे एलआयसी. म्हणूनच तर आजचे युवा तरुण मुले, मुली व बेरोजगार मोठ्या प्रमाणात विमा प्रतिनिधी रुपाने चांगले करीयर व उज्वल भविष्यासाठी एलआयसीकडे वळताना मोठ्या प्रमाणात दिसून येतात. या धकाधकीच्या जीवनात आपल्या सुरक्षेसह प्रत्येक व्यक्तीला विमा कवच सुध्दा उपलब्ध झाले पाहिजे. हाच उदात्त हेतू समोर ठेवून बजाजनगर येथे भारतीय आर्युविमा महामंडळ LIC विमा प्रतिनिधी भरती प्रशिक्षण व वाळुज औद्योगिक वसाहतीसह परिसरातील विमा धारकांना एलआयसीचा (हप्ता) प्रिमियम भरण्यासाठी एलआयसी पॉईंट सुरू करण्यात आले आहे.

बजाजनगर येथील मोरे चौकाजवळ असलेल्या खिंवसरा बिझनेस सेंटर येथे एलआयसीचे वरिष्ठ विमा प्रतिनिधी तथा CLIA संतोष भराड यांनी हे पॉईंट सुरू केले आहे. त्याचे उद्घाटन करण्याचे भाग्य संतोष भराड यांनी आई कुसुमबाई आबाराव भराड यांना दिले.

प्रथम हर्षवर्धन भराड यांनी श्रीफळ फोडून व कुसुमबाई भराड यांच्या हस्ते फीत कापून या विमा प्रतिनिधी भरती, प्रशिक्षण व प्रीमियम पॉईंटचे मोठ्या उत्साहात उद्घाटन केले. कार्यक्रमास शाखाधिकारी संजय नरवडे, उपशाखा अधिकारी डिव्हिजन ऑफिस CLIA सुनील कुलकर्णी, एलआयसीचे निवृत्त अधिकारी अर्जुन अंभोरे, वरीष्ठ विमा प्रतिनिधी MDRT लक्ष्मण चव्हाण, स्टार हेल्थ शाखाधिकारी भूषण कापुरे, सहदेव ढाकणे, प्रदीप मुसळे, इप्का लॅबोरेटरीजचे राजू सावळे, विजय गुजर, माजी सरपंच अंकुशराव कळवणे, जिल्हा परिषद सदस्य शामराव बनसोडे,

 

सरपंच केशवआप्पा गायके, निवृत्ती काळवणे, तुकाराम काळवणे, किशोर मिश्रा, अशोक काळवणे, माजी पंचायत समिती सदस्य संतोष गायकवाड, माजी ग्रामपंचायत सदस्य सुभाष सोनवणे, भूमिपुत्र सामाजिक संघटनेचे अध्यक्ष पोपटराव अधिक,

दैनिक सकाळचे बातमीदार आर के भराड यांच्यासह सर्व विमा प्रतिनिधी, पॉलिसीधारक, नातेवाईक व मित्र मंडळ उपस्थित होते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *