February 5, 2026

  1. वाळूजमहानगर, (ता.14) – लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांची जयंती मुंडे चौक बजाजनगर येथे सोमवारी (ता.12) रोजी सकाळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
  2. प्रथम पाहुण्यांच्या हस्ते स्मारकाची पूजा करून पुष्प वृष्टी करण्यात आली. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल चोरडिया, पंचायत समिती सदस्य सतीश पाटील, वडगावचे सरपंच सुनील काळे, श्रीकांत साळे, गोपीनाथ वाघ, उज्वला दहिफळे, बाळासाहेब सानप, रमेश गायकवाड, रामदास फड, दामोदर घुगे, विष्णु खेडकर, भास्करराव पाले, निलेश सोनवणे, कल्याण राकडे, जितू सरकटे उपस्थित होते. प्रास्ताविक लोकनेता फाउंडेशनचे सचिव माधव केदार, सूत्रसंचालन लोकनेता फाउंडेशनचे अध्यक्ष सुदर्शन वाघ तर आप्पासाहेब खेडकर यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साई सेवा ग्रुप पंढरपूर, लोकनेता फाउंडेशन बकवाल नगर, लोकनेता फाउंडेशन बजाजनगर, लोकनेता फाउंडेशन घाणेगाव, लोकनेता फाउंडेशन वडगाव कोल्हाटी, लोकनेता फाउंडेशन गट नंबर, लोकनेता फाउंडेशन महिला आघाडी, मोहठा देवी मंदिर ट्रस्ट, जय भगवान महासंघ यांनी परिश्रम घेतले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *