February 5, 2026

वाळूजमहानगर, (ता.24) – सकाळ माध्यम समूहाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य चित्रकला स्पर्धेला वाळूज परिसरातून मोठा प्रतिसाद मिळाला. पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी चार गटातून या स्पर्धा घेण्यात आल्या. बजाजनगर येथील राजा शिवाजी विद्यालय, स्व.भैरोमल तनवाणी विद्यामंदिर व लाल बहादूर शास्त्री विद्यालय या सेंटरवर या स्पर्धा रविवारी (ता.22) रोजी मोठ्या उत्साहात झाल्या.

सकाळ चित्रकला स्पर्धा म्हणजे ही विद्यार्थ्यांसाठी एक पर्वणीच असते. दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्र व गोव्यात या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. त्यामुळे विद्यार्थी या स्पर्धेची जणू काही वाटत पाहत असतात. रविवारी (ता.22) रोजी या स्पर्धा मोठ्या उत्साहात झाल्या. बजाजनगर येथे वाळूज परिसरातील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात या स्पर्धेत भाग घेतला. वाळूज परिसरातील वाळूज, रांजणगाव (शेणपुंजी), पंढरपूर, बजाजनगर, वडगाव (को.), तिसगाव, साजापूर, करोडीसह गट नंबर मधील विद्यार्थ्यांनी बजाजनगर व सिडको वाळूज महानगर येथील चित्रकला स्पर्धा सेंटरवर येऊन उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. अ ब क ड अशा चार गटात पहिली ते दहावी च्या विद्यार्थ्यांसाठी ही चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.

त्यातील पहिली व दुसरीच्या अ गटासाठी वाढदिवसाचा केक, माझे आवडते कार्टून मधील पात्र, मास्क आणि मी व प्राणी संग्रहालय असे चार विषय होते. तिसरी ते चौथी च्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ब गट होता. या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शाळा, फिश टॅंक मधील मासे, बागेतील दृश्य व घरातील स्वच्छता कामगार असे विषय होते. क गट हा पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी होता. या विद्यार्थ्यांसाठी विषय होता – मी लस घेतली हे दाखवणारा मुलगा किंवा मुलगी, मिरवणुकीसाठी सजवलेला घोडा, क्रिकेटचा सामना व बँकेत मास्क परिधान केलेले लोकं. तसेच आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ड गट होता. या ड गटासाठी पाण्याखालची जीवसृष्टी, गायींचा गोठा किंवा गोशाळा, कोरोना योध्ये, अपघात व बाजारपेठेत मास्क घालून खरेदी करणारे लोकं. असे पाच विषय होते. बजाजनगर येथील राजा शिवाजी विद्यालय, स्व भैरोमल तनवाणी विद्यालय व सिडको वाळूज महानगर मधील लाल बहादूर शास्त्री विद्यालय अशा तीन सेंटर वरून घेण्यात आलेल्या या चित्रकला स्पर्धेसाठी परिसरातील शेकडो विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.

राजा शिवाजी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका जाधव, प्राथमिक विभागाचे के पी घायवट, ई डीपठाण, बी.जी. गायकवाड, एस. आर जाधव, सि. के जाधव, वाय.डी. जाधव, पी.आर.राजे, विनोद राठोड लाल बहादूर शास्त्री माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती मेघा पाटील, सहशिक्षक शशिकांत माने, संत एकनाथ प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सुवर्णा मराठे यांनी सकाळ चित्रकला स्पर्धेमध्ये मोलाचे सहकार्य केले.


ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी दैनिक सकाळचे अजित वाणी, अजय पुणेकर, सुनील दाभाडे, आर के भराड यांनी परिश्रम घेतले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *