
वाळूजमहानगर, (ता.25) – सर्वांगीण मानव विकासाची गुरुकिल्ली असलेल्या राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज लिखित युगग्रंथ ग्रामगीता संगीत प्रवचन सप्ताह श्री गुरुदेव प्रार्थना मंदिर बजाजनगर वाळूज महानगर छ्त्रपती संभाजीनगर येथे गुरुवारी (ता.27) जुलै पासून गुरुवारी (ता.3) ऑगस्ट पर्यंत आयोजित करण्यात आला आहे.
पुरुषोत्तम मास (अधिक महिना) निमित्त गुरुवार 27 जुलै पासून 3 ऑगस्ट पर्यंत या सप्ताहाचे आयोजन श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. हभप ज्ञानेश्र्वर महाराज केसाळे, दिग्रस जि. यवतमाळ यांच्या मधुर वाणीतून व संगीताच्या साथीने ग्रामगीतेच्या संपूर्ण 41 अध्यायाचे अध्ययन व प्रवचन दररोज दुपारी 3 ते 6 या वेळेत होईल. सहभागी श्रोत्यांना मंडळातर्फे ग्रामगीता भेट देणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
