
वाळूजमहानगर, (ता.19) – बजाजनगर येथे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्या वतीने शिवस्मारक परिसर येथे हभप रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक यांच्या श्रीरामकथेला गुरुवारी (ता.19) जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. दररोज सायंकाळी 6:30 ते 9:30 दरम्यान होणारी ही श्रीराम कथा 25 जानेवारी पर्यंत चालणार आहे.
आकर्षक स्वागत कमाण व ऐतिहासिक देखाव्याचे भव्य व्यासपीठ, त्यावर सात फुटी तेजस्वी श्रीरामाची मुर्ती. तसेच भाविकांना बसण्याची सुव्यवस्था शिवाय भाविकांच्या सुरक्षेकरीता पांढरा गणवेश व भगवी टोपी परिधान केलेले स्वयंसेवक. हे या श्रीराम कथेचे खास वैशिष्ट्य आहे. विशेष म्हणजे जे भाविक या कथेस प्रत्यक्ष उपस्थित राहू शकत नाही. अशा व्यक्तींसाठी थेट प्रक्षेपणाचीही व्यवस्था संयोजकांच्या वतीने करण्यात आलेली आहे.
या कार्यक्रमास शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हा संघटक प्रतिभा जगताप, उपजिल्हाप्रमुख बप्पा दळवी, राजेंद्र राठोड, विधानसभा संघटक सुशील खेडकर, भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस प्रभाकर मते यांची प्रमुख उपस्थिती आहेत.
95 दाम्पत्यांच्या हस्ते महाआरती –
गुरुवारी कथेचा पहिला दिवस असून आजची कथा संपन्न झाल्यानंतर बजाजनगर परिसरातील 95 दंपत्यांनी या प्रसंगी महाआरती केली.

25 तारखेपर्यंत चालणार कथा –
बजाजनगर येथे गुरुवारी (ता.19) रोजी सुरू झालेली ही श्री राम कथा 25 तारखेपर्यंत चालणार आहे. या श्रीराम कथेचा परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा. असे आवाहन आयोजक तालुकाप्रमुख बाळासाहेब गायकवाड, उपतालुका प्रमुख सचिन गरड, उद्योजक कैलास भोकरे, विष्णू जाधव, गणेश नवले, कृष्णा राठोड, सुभाष साबळे, नंदकुमार साळुंखे, शहरप्रमुख सागर शिंदे, उपशहरप्रमुख किशोर खांडरे, रमेश शेळके, विश्वास येवले, भाऊसाहेब डमाळे, विभागप्रमुख सुदाम भंडे, बिबन सय्यद, काकाजी जीवरग, कैलास हिवाळे, रामनाथ सुरासे, दत्तात्रय वर्पे, लखन सलामपुरे, दीपक कानडे, नामदेव सागडे, सतीश हीवाळे, संतोष चंदन, शिवाजी ढेपे, करण साळे, विशाल खंडागळे, अमोल पोटे, प्रवीण चंदन, सरपंच मनीषा धोंडरे, जयश्री दिवेकर, अनिता हेकडे, लक्ष्मीबाई पवार, सुनिता राठोड, राधा राठोड, अमर राजपूत, संध्या सदावर्ते, उपसरपंच कपिंद्र पेरे, संजय झळके, शोभा बनकर, विजय सरकटे, गौरव पाटील, अनिकेत थोरात, महेंद्र खोतकर, मनोज गायके, निलेश चव्हाण, ज्ञानेश्वर गोल्हार, सुरेश राठोड, सजन पवार, मनोज पवार, गणेश वाघ, गणेश सूर्यवंशी, महेश घोडके, अक्षय साळुंखे, प्रशांत पाथ्रीकर, गौरव खणसे, नवनाथ काळे, अण्णा कांडेकर, रमेश पाटील, महिला आघाडीच्या मंदाताई भोकरे, मीराताई पाटील, कमलताई गरड, छाया जाधव, शोभा सरकटे, अनिता डहारिया, वैशाली जिवरग, अलका शिंदे, मीरा चव्हाण,
जोत्सना सोनवणे, रूपाली शुक्ला, मंदा तुपे, सविता वैद्य, लता माळी, छाया कुकलारे, रोहिणी मुळे, मनीषा घाडगे, विद्या राठोड यांनी केले आहे.
