February 5, 2026

वाळूजमहानगर, (ता.19) – बजाजनगर येथे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्या वतीने आपले शिवस्मारक परिसर येथे 19 जानेवारी ते 25 जानेवारी रोजी सायंकाळी 6:30 ते 9:30 दरम्यान ह भ प रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक यांच्या श्रीरामकथेचे आयोजन करण्यात आले आहे. या राम कथेची पुर्ण तयारी झाली असून कथेला उपस्थित राहण्यासाठी विरोधी पक्षनेते संयोजक अंबादास दानवे यांनी बजाजनगरातील नागरिकांना निमंत्रण फेरी काढून घरोघरी जाऊन निमंत्रण दिले आहे.

या कार्यक्रमास शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर महिला आघाडी संपर्कप्रमुख आ.मनीषा कायंदे, आमदार उदयसिंह राजपूत, जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी, राजेंद्र राठोड,माजी महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हा संघटक प्रतिभा जगताप, उपजिल्हाप्रमुख बाप्पा दळवी, राजेंद्र राठोड ,विधानसभा संघटक सुशील खेडकर, भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस प्रभाकर मते यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत. परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या श्रीराम कथेचा लाभ घ्यावा.

 

असे आवाहन आयोजक तालुकाप्रमुख बाळासाहेब गायकवाड, उपतालुका प्रमुख सचिन गरड, कैलास भोकरे, विष्णू जाधव, गणेश नवले, कृष्णा राठोड, सुभाष साबळे, बळीराम पोले, नंदकुमार साळुंखे, शहरप्रमुख सागर शिंदे, उपशहरप्रमुख किशोर खांडरे, रमेश शेळके, विश्वास येवले,भाऊसाहेब डमाळे, विभागप्रमुख सुदाम भंडे, बिबन सय्यद, काकाजी जीवरग, कैलास हिवाळे, रामनाथ सुरासे, दत्तात्रय वर्पे, लखन सलामपुरे, दीपक कानडे, नामदेव सागडे, सतीश हीवाळे ,संतोष चंदन , शिवाजी ढेपे, करन साळे, विशाल खंडागळे, अमोल पोटे, प्रवीण चंदन,सरपंच मनीषा धोंडरे, जयश्री दिवेकर, अनिता हेकडे, लक्ष्मीबाई पवार, सुनिता राठोड, राधा राठोड, अमर राजपूत, संध्या सदावर्ते, उपसरपंच कपिंद्र पेरे, कडू कीर्तीकर, संजय झळके, शिवाजी मोरे, अर्जुन जोक, सुभाष खाडे, शोभा बनकर, विजय सरकटे, गौरव पाटील, अनिकेत थोरात, महेंद्र खोतकर, मनोज गायके, निलेश चव्हाण, ज्ञानेश्वर गोल्हार, सुरेश राठोड , सजन पवार, मनोज पवार, गणेश वाघ, गणेश सूर्यवंशी, महेश घोडके, अक्षय साळुंखे, प्रशांत पाथ्रीकर, गौरव खणसे,नवनाथ काळे, दिनेश लोंढे, श्रीकांत तुपे, अभिजीत खारतोडे, विक्की गिरे, अण्णा कांडेकर, रमेश पाटील, महिला आघाडीच्या मंदाताई भोकरे, मीराताई पाटील, कमलताई गरड, छाया जाधव, शोभा सरकटे, अनिता डहारिया, वैशाली जिवरग, अलका शिंदे, मीरा चव्हाण, जोत्साना सोनवणे, रूपाली शुक्ला, मंदा तुपे ,सविता वैद्य, लता माळी, छाया कुकलारे ,रोहिणी मुळे, मनीषा घाडगे ,विद्या राठोड यांनी केले आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *