
वाळूज महानगर, (ता.19) – छत्रपती शिवाजी महाराज यांची 396 वी जयंती बजाजनगर येथील मीनाताई ठाकरे मार्केट मध्ये व्यापारी बंधुकडून गुरुवारी 19 फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी प्रमुख पाहुणे तथा स्व मीनाताई ठाकरे मार्केट मधील जेष्ठ व्यापारी मंगेश पाटील, अँड नामदेव सावंत यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिनमेस पुष्प अर्पण व पूजन करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी अँड नामदेव सावंत यांनी मनोगत व्यक्त केले. धनराज पाटील, मंगेश चौधरी, भाऊसाहेब सोनवणे, कृष्णा मापारे , गोपाळ पाटील, समाधान पाटील, दत्तराव निकम, उत्तम माने, मेजर देवानंद सावंत, नामदेव गायकवाड, अमोल धुळे, गौतम मोरे, पवन भाऊ, विवेक भांडेकर, रतन शेलार आदी उपस्थित होते.
