
वाळूजमहानगर, (ता.13) – बजाजनगर येथील दगडोजीराव देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि इ. भा. पाठक महिला कला महाविद्यालयातील गृहविज्ञान विभागाच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय वारली चित्रकला कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
या कार्यशाळेसाठी प्रशिक्षक म्हणून फेव्हीक्रिल कंपनीच्या प्रशिक्षक कविता सप्रे यांनी विद्यार्थ्यांना वारली चित्रकलेचे प्रशिक्षण दिले. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उस्फुर्त सहभाग नोंदविला. अध्यक्षस्थानी दगडोजीराव देशमुख कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. युवराज धबडगे तर प्रमुख अतिथी म्हणून इ. भा. पाठक महिला कला महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. वाजपेयी उपस्थित होत्या. यावेळी कार्यशाळेचे अध्यक्ष व उद्घाटक प्राचार्य डॉ.युवराज धबडगे यांनी वारली चित्रकलेचा इतिहास थोडक्यात सांगितला. डॉ.अन्विता अग्रवाल. आणि प्रा. अनुजा कंदी यांनी परिश्रम घेतले. तसेच प्रा. सुनंदा पगार, डॉ. भारती भवर आणि डॉ.वर्षा पाईकराव यांनी कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले.
