February 5, 2026


वाळूज महानगर, (ता.16) – दसरा व नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून उत्तर भारतीयांच्या वतीने बजाजनगर येथील रामलीला मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या रामलीला कार्यक्रमाचे उद्घाटन वाळुज एमआयडीसी ठाण्याचे पोलीस निरीक्षक अविनाश आघाव, पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे, योगेश शेळके, वडगाव (को.) – बजाजनगरचे सरपंच सुनील काळे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाप्पा दळवी, माजी सरपंच सचिन गरड यांच्या उपस्थितीत रविवारी (ता.15) रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास मोठ्या उत्साहात झाले.

या प्रसंगी रामलीला उत्सव समितिचे अध्यक्ष नरसिंह नारायण सिंह, कार्यअध्यक्ष प्रताप सिंह, उद्योजाक नरेंद्र सिंह यादव, उपाध्यक्ष राजेश सिंह, जयप्रकाश सिंह, इकबाल बहादुर सिंह, सचिव राधेश्याम शर्मा, कोषाध्यक्ष कैलाश यादव, शुभम सिंह, अरविंद सिंह, आर के सिंह, ज्योतिष मित्तल, उपेंद्र श्रीवास्तव, रामजनम पंडित, राजेश्वरानंद पंडित, कपिल देव पाठक, राघवेंद्र सिंह, नंदकिशोर सिंह, रामपती यादव, चंदेश्वर यादव, कुंदन त्रिपाठी, कैलास भोकरे, योगेश साळे आदि पदाधिकारी उपस्थित होते. बजाजनगर येथील रामलीला मैदानावर उत्तर भारतीय यांच्या वतीने सुमारे 21 वर्षापासून हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. या कार्यक्रमात नऊ दिवस रामलीला होऊन दसऱ्याच्या दिवशी म्हणजेच विजयादशमीला राम रावणाचे युद्ध होऊन रावण दहनाने कार्यक्रमाची सांगता होते. कार्यक्रम पाहण्यास वाळूज परिसरातील लाखो भाविकांची अलोट गर्दी होते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *