वाळूजमहानगर – बजाजनगर येथे रामलीला समिती व चेर्रेटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अँड. नरशिंग नारायण सिंग यांच्या अध्यक्षतेखाली रामलीला संस्कृतीक कार्यक्रमाची सुरुवात रविवारी (ता.25) सप्टेंबर राेजी मोठ्या उत्साहात झाली. यात उत्तर प्रदेशातील कलावंतांकडून रामलीलाचे सादरीकरण करण्यात येत आहे. या कार्यक्रमासाठी बजाजनगरसह वाळूज परिसरातील भाविकांची गर्दी हाेत आहे.
बाजाजनगरातील रामलीला मैदानावर रामलीला समिती व चैरेटेबल ट्रस्टच्या वतीने नवरात्र उत्सवा त निमित्त रामलीला संस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दसऱ्या पर्यंत चालणाऱ्या या रामलीला कार्यक्रमात संपूर्ण रामायण नाट्य स्वरूपात दाखविण्यात येते. यावर्षी उत्तर प्रदेशातील काशी येथील धर्म प्रचारक रामायण रामलीला कार्यक्रमाचे सादरीकरण करत आहेत.
यामध्ये अहिल्या उद्धार, गंगा अवतरण, नगर दर्शन, फुलवारी, धनुष्य यज्ञ, वणासुर-रावण संवाद, सीता विवाह, रामाचा वनवास, कैकयी, दशरथ, राम, केवट आदींचे संभाषण, शूर्पणखा हिचे नाक, कान, कापणे. त्रिशरा वध, सीतेचे रावणाकडून अपहरण, राम-शबरी, राम-हनुमान, राम-भरत यांच्या भेटी. बाली वध, कुंभकर्ण, अहिरावन, रावण वध आदी भागांचे सादरीकरण करण्यात येत आहे.
या रामलीला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समितीचे उप अध्यक्ष जयप्रकाश सिंह, उद्योजक नरेंद्रसिंह यादव, सचिव राधेश्याम शर्मा, कोषाध्यक्ष कैलास यादव, ए बी सिंग, कोषाध्यक्ष सी वाय यादव, अरविंद रामजनमसिंह, रुद्रप्रताप सिंह, उपेन्द्र श्रीवास्तव, राघवेन्द्र सिंह, कुंदन त्रिपाठी, बच्चा सिंह, रवि सिंह, रामजनम सिंग,आर एम दुबे, आर.पी.वर्मा परिश्रम घेत आहेत. नऊ दिवस चालणारा हा कार्यक्रम पाहण्यास वाळूज परिसरातील बजाजनगर, पंढरपूर, रांजणगाव, वळदगाव, वडगाव (को.), साजापूर, करोडी येथील नागरिकांची गर्दी होत आहे. दसर्याला
बुधवारी (ता.5) रोजी राम रावण युद्ध होऊन रावण दहणाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.