February 5, 2026

वाळूजमहानगर, (ता.16) – भूमिपुत्र सामाजिक संस्थेच्या वतीने राजमाता जिजाऊ जयंती निमित्त बजाजनगर येथे विविध सामाजिक उपक्रमासह राजमाता जिजाऊ यांच्या स्मारकाचे लोकार्पण मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक व आर आर फाउंडेशनचे संस्थापक विनोदभैया पाटील यांच्या हस्ते गुरुवारी (ता.12) जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता मोठ्या उत्साहात करण्यात आले.

भूमिपुत्र बहुउद्देशीय सामाजिक संस्थेची स्थापना बजाजनगर येथे 2009 रोजी करण्यात आली. बजाजनगर ही एक कामगार वसाहत आहे. वाळूज औद्योगिक वसाहतीमुळे बजाजनगर या वसाहतीची निर्मिती झाली. येथील कामगारांच्या समस्यांसह नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी भूमिपुत्र सामाजिक संस्थेच्या वतीने नेहमी पुढाकार घेण्यात येतो. याशिवाय संस्थेच्या वतीने वृक्षारोपण, गुणवंताचा सत्कार, आरोग्य तपासणी, रक्तदान असे समाज उपयोगी कार्यक्रम राबविण्यात येते. तसेच महापुरुषांची पुण्यतिथी व जयंती साजरी करण्यात येते.

या विविध उपक्रमासह नागरिकांच्या सेवेसाठी ना नफा ना तोटा या तत्त्वावर स्वर्गरथ, रुग्णवाहिका चालविण्यात येत आहे. विशेष म्हणजे नुकत्याच आलेल्या महाभयानक कोविड-19 या संकटात संस्थेच्या माध्यमातून कोविड योद्धा म्हणून पुढाकार घेण्यात आला. वर्षभर चालवण्यात जाणाऱ्या या उपक्रमाचा एक भाग म्हणून भूमिपुत्र सामाजिक संस्थेच्या वतीने 12 जानेवारी 2023 रोजी जिजाऊ जयंती निमित्त राजमाता जिजाऊंच्या स्मारकाचे लोकार्पण व सुमनबाई त्रिंबक जाधव यांच्या स्मरणार्थ अन्नछत्रलयाचे लोकार्पण विनोद भैय्या पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.p

प्रथम संस्थेच्या जागेवर सकाळी 8 वाजता श्रीकृष्ण पैठणपगारे यांच्या हस्ते जिजाऊ मूर्तीचा दुग्ध अभिषेक करण्यात आला. त्यानंतर सकाळी 11 वाजता गरुड झेपचे संचालक निलेश सोनवणे यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या रक्तदान शिबिरामध्ये 55 रक्तदात्यांनी उस्फूर्तपणे रक्तदान केले. यावेळी सत्यसाई ब्लड बँकेच्या वतीने रक्त संकलन करण्यात आले. उद्योजक विजय जाधव यांच्या वतीने आईच्या स्मरणार्थ बांधण्यात आलेल्या अन्नछत्रालयाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे उद्योजक हनुमान भोंडवे, माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल चोरडिया, तिसगाव चे उपसरपंच विष्णू जाधव, नितीन जाधव, श्री गजानन विद्यालयाचे ईश्वर जाधव, विजय जाधव, सामाजिक कार्यकर्ते पारसचंद साकला, अजय सूर्यवंशी, शरद पवार, मंगेश आदिक, काकासाहेब चेळेकर, किरण जाधव, अमोल जाधव, राजू पाटील जाधव, महेंद्रा जाधव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते व सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक संस्थेचे अध्यक्ष पोपटराव आदीकपाटील यांनी तर सूत्रसंचालन रमेश शेळके यांनी केले. आभार अर्जुनराव आदमाने यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे कैलास भोकरे पाटील, काकासाहेब चेळेकर, भाऊसाहेब डमाळे, आसाराम करपे, रामदास पैठणपगारे, अर्जुन चेळेकर, पोपट हांडे, राऊतराव पाटील, कैलास कदम, साहेबराव पाथरीकर, बालाजी गिरी, अतुल पेरे, विजय सरकटे, ऋषी डमाळे, आश्विन आदीक, सौरभ करपे, कृष्णा पैठणपगारे, अण्णा कांडेकर, संजय करपे, सतीश हिवाळे, तुकाराम मगर, आनंदराव पाटील उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी अल्पवहाराची व्यवस्था संजय महिंद्रा लक्ष्मी हॉटेल यांच्या वतीने करण्यात आली होती.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *