
बजाजनगर, (ता.4) – येथील श्री जागृत हनुमान मंदिराच्या सभागृहात महेश नवमी उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त माहेश्वरी मंडळ वाळूज प्रभागाच्या वतीने बुधवारी 4 जून रोजी सकाळी श्री हनुमानाच्या मूर्तीला महा रुद्राभिषेक व महाआरती करण्यात आली.
महेश नवमी निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 26 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी मंडळाच्या वतीने आयोजित क्रिकेट स्पर्धेत सहभागी खेळाडूंचा बक्षिसे देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष मनिष मुंदडा, सचिव श्रीनिवास सोनी, संघटन मंत्री संतोष राठी, ब्रिजेश मोदाणी, ईश्वर हेडा, युवा मंचचे अध्यक्ष योगेश मिनियार, डॉ. अमित तोतला, डॉ. आकाश लाहोटी, रक्तदान शिबिर उपक्रम प्रमुख राजेश भक्कड, विजया काबरा, किरण राठी, रश्मी सोनी, शीला मिनियार, उज्वला भक्कड यांच्यासह मंडळाचे सदस्य उपस्थित होते. महेश नवमी निमित्त छत्तीसगड येथील पंधरा वर्षीय भजन सम्राट ओमजी अग्रहारी यांचा सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम मसिआ सभागृहात झाला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.
