
वाळूजमहानगर, (ता.21) – बजाजनगर येथील स्व. भैरोमल तनवानी माध्यमिक विद्यालयात मतदान जनजागृती अभियान अंतर्गत विविध उपक्रम घेण्यात येत आहे. प्रथम विद्यार्थी संसद मंडळाची बैठक घेण्यात आली. यावेळी मुख्याध्यापिका सुरेखा शिंदे व बी. एल. ओ. सुभाष पाटील यांनी मार्गदर्शन केले.
या मतदार जनजागृतीसाठी विद्यार्थी संसद मंडळ व निवडणूक साक्षरता मंडळ यांनी परिसरातील नागरिकांची भेट घेऊन त्यांना मतदान करण्याचे आवाहन केले. मतदान जनजागृतीसाठी शाळेत नव मतदार व पालक यांच्यासाठी ‘मी मतदान करणारच’ असे घोषवाक्य लिहलेले सेल्फी पॉईंट तयार केले. संस्थेचे हनुमान भोंडवे, अशोक लगड, विजय उखळे, राजेंद्र माने, पंडीत नवले यांच्या प्रेरणेने सकाळी 7 वाजता विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली. याफेरीत विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृतीसाठी ‘माझे आई -बाबा मतदान करणारच’ व ‘माझे आजी-आजोबा मतदान करणारच’ असे अनेक घोषवाक्य लिहलेले फलक हातात घेऊन घोषणा देत होते. त्रिमूर्ती चौक व गणपती मंदिर परिसरात विद्यार्थ्यांनी पथनाट्यही सादर केली. शाळेत पालकांसाठी अभिप्राय लेखन व सुंदर हस्ताक्षर आणि महिलांसाठी रांगोळी स्पर्धाही आयोजित केली आहे.
