
वाळूजमहानगर, (ता.7) – आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त वाळूजमहानगर पत्रकार संघटनेच्या वतीने महाराणा प्रताप चौक, बजाजनगर येथील मीनाताई ठाकरे मार्वेâटमध्ये ‘दर्पण दिन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊन आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करण्यात आले.
प्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष वाळूज महानगर पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर कुरणे व प्रमुख पाहुणे विद्यमान अध्यक्ष आर. के. भराड यांच्या हस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. नामदेव सावते यांनी केले. यावेळी पत्रकार संतोष उगले, संदीप चिखले, श्यामसुंदर गायकवाड, अशोक कांबळे, शिवाजी बोडखे, गजानन राऊत, संजय निकम, संजय काळे, निलेश भारती, प्रविण नितनवरे, जे. के. आमराव, रमेश दाभाडे, सुखदेव सोनवणे, अशोक वाहूळ, सूर्या पठारे आदींची उपस्थिती होती.
