
वाळूजमहानगर, (ता.28) – मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनाचा शेवट गोड झाल्याने सकल मराठा समाजाच्या वतीने बजाजनगर येथे शनिवारी (ता.27) रोजी सकाळी व सायंकाळी महिलांच्या वतीने फटाके फोडून गुलालाची उधळण करत जल्लोष करण्यात आला.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे. या मागणीसाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केले होते. गेल्या अनेक वर्षापासून हा संघर्ष सुरू होता. त्याचाच एक भाग म्हणून 26 जानेवारी पासून मुंबई येथे उपोषण करण्याचा बेत आखण्यात आला होता. त्यासाठी 20 तारखेपासूनच मनोज जरांगे पाटील अंतरवली पासून मुंबईकडे रवाना झाले होते. 
अखेर 26 जानेवारी उजाडताच सरकारने मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य केल्या. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश आल्याने बजाजनगर येथील महाराणा प्रताप चौकात शनिवारी (ता.27) रोजी सकाळी 11 सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास लोकमान्य चौकात महिलांच्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी, गुलालाची उधळण व पेढे वाटप करून जल्लोष करण्यात आला. यावेळी विविध घोषणा देत संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा जयजयकार करण्यात आला. यावेळी सुरेखा शिंदे, रेखा पाटील कळंबकर, मिरा कोल्हे, अनिता आगलावे, पुजा गटकर, गीतांजली देशमुख, अनिता मोरे, सुनिता वानखेडे, शकुंतला म्हात्रे, अनिता जाधव, सुनिता शिंदे, गोपिका ढगे, रेणुका शिंदे, रेखा मानकर, सुनिता देवरे, अनिता भोसले, रंजना कदम, नितीन देशमुख, कैलास भोकरे, अर्जुन आदमाने, अमोल काळे, शरद जाधव, गणेश सूर्यवंशी, गणेश कोलते, कृष्णा पवार, के. पी. चव्हाण, शिवाजी ढेपे, औदुंबर देवडकर, अशोक कटारे, अण्णा कांडेकर, मनोहर सनेर, कल्याण आगळे, उमेश दुधाट यांच्यासह मोठ्या संख्येने मराठा समाज बांधवांची उपस्थिती होती.
