वाळूजमहानगर, ता.26 (बातमीदार) – पती कंपनीत गेल्यानंतर घरी येवून छेडछाड करत तिच्या सोबत बळजबरीने फोटो काढले. आणि तु मला तुझ्या सोबत शरिरीसंबंध करून दे, नाहीतर हे फोटो तुझ्या नवऱ्याला दाखवतो. तो तुला सोडून देईल. नाही दिले तर, मी तुम्हा दोघांना मारून टाकील. अशी धमकी देवून तिच्या इच्छे विरुध्द तिच्याशी बळजबरीने जबरदस्ती करून अनेकवेळा शारिरीक अत्याचार केला. एकोणाविस वर्षीय नवविवाहितेवर नात्यातीलच 30 वर्षीय इसमाने बजाजनगर येथे सतत पाच महिने केलेले हे कुकृत्य गुरुवारी (ता.25) रोजी उघडकीस आले.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मेहकर तालुक्यातील एकोणावीस वर्षीय नवविवाहिता पतीसह 22 डिसेंबर 2023 पासून बजाजनगर येथे किरायाची खोली घेऊन राहते. तिचा पती वाळूज औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत कामगार आहे. तिच्या पतीकडील नातेवाईक जितेंद्र परसरराम गडदे (वय 30 वर्ष) रा. किनखेडा ता.मंठा जि.जालना हा सुद्धा पत्नीसह तेथेच राहतो. गडदे व पीडितेचा पती सोबत एकाच कंपणीमध्ये काम करतात. नातेवाईक असल्याने त्यांचे घरी येणे जाने होते. पीडीतेचा पती कंपनीत गेल्यास परत येणार नाहीत हे त्याला माहित होते. त्यामुळे तो तिच्या घरी आल्यावर गप्पा गोष्टी करून तिच्या सोबत लगट करण्याचा प्रयत्न करत होता. तो अंगाला नको त्या ठिकाणी स्पर्श करत होता. तुम्ही असे काही करू नका, नसता मी माझ्या नवऱ्याला व वडिलांना सांगेल असे ती म्हणाली असता, तु जर कोणाला सांगीतले तर मी तुला व तुझ्या नवऱ्याला मारून टाकील अशी धमकी दिली. नवऱ्याच्या व तिच्या जिवाला त्याच्यापासून धोका होईल म्हणून ती घाबरून तिच्यासोबत घडत असलेला प्रकार कोणाला काही सांगीतला नाही.
असा झाला प्रकार उघड –
15 एप्रिल 2024 रोजी पिडीतेचा पती सकाळी कंपनीत कामाला गेल्यानंतर दुपारी 12 वाजेच्या सुमारास आरोपी जितेंद्र परसरराम गडदे हा तिच्या घरी आला. आणि बळजबरीने शारिरीक संबंध करत होता. तेव्हा तिचा पती अचानक कंपनीमधून घरी आला. आणि त्याने खिडकीतून दोघांना नको त्या अवस्थेत पाहिले. त्याने त्यांना घराचा दरवाजा उघडायला लावला. तेव्हा तो तिथून पळून गेला. तेव्हा पतीला तिने तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगीतला. याप्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून आरोपी जितेंद्र परसरराम गडदे याच्या विरुद्ध वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
