March 22, 2026

वाळुज महानगर (ता.4) – नंदीग्राम मित्र मंडळ वाळूज महानगरच्या वतीने नंदीग्राम दिनदर्शिका 2026 चे प्रकाशन रविवारी 28 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता बजाजनगर येथील सिद्धीविनायक गणपती मंदिर येथे करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक तथा नंदीग्राम मित्र मंडळाचे मार्गदर्शक बालाजी शिंदे होते.

यावेळी अध्यक्ष व प्रमुख पाहुणे उपस्थित असलेले शिवसेना तालुका प्रमुख हनुमंत भोंडवे यांच्या हस्ते नंदीग्राम दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष आय. जी. जाधव, सचिव एफ बी शेख, कार्याध्यक्ष शंकर पवळे चिखलीकर, कार्याध्यक्ष विजय उखळे, युवा मंडळाचे कार्याध्यक्ष माधव पाटील घोरबांड, सहकोषाध्यक्ष चरण खराडे, सहसचिव वीरभद्र वनशेट्टी, कोषाध्यक्ष उत्तम चिकाले, मार्गदर्शक भरत जायभये, दिगंबर शिंदे, गोविंद बागल, दत्ता वाकडे, दत्ता पांचाळ, युवा मंडळाचे साहेबराव नारसनवाड, मारुती आयतवाड यांच्यासह नंदीग्राम मित्र मंडळ वाळूज महानगर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एफ. बी. शेख यांनी केले. तर आभार बालाजी जाधव यांनी मानले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *