
वाळूजमहानगर, (ता.14) – बजाजनगरात तरुणांच्या दोन गटात सिनेस्टाईल हाणामारी रस्त्याने जाताना आपापसात वाद झाल्याने टवाळखोर व गुन्हेगारी प्रवृत्तीचे दोन तरुणांचे गट समोरासमोर येऊन आपापसात भिडल्याने त्यांच्यात बुधवारी (ता.13) रोजी दुपारी बजाजनगर येथील हायटेक कॉलेजच्या रस्त्यावर सिनेस्टाईल पद्धतीने हाणामारी झाली.
वाळूज औद्योगिक वसाहतीमुळे बजाज नगर या कामगार वसाहतीत गुन्हेगारीचे साम्राज्य पसरले असून ठीक ठिकाणी मारामाऱ्या व चोऱ्या चपात्या होताना दिसून येत आहे. बुधवारी (ता.13) रोजी दुपारी बजाजनगर येथील हायटेक कॉलेजच्या रस्त्यावर टवाळखोर आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांचे दोन गट एकमेकांत भिडल्याने दोन्ही गटातील तरुणांनी एकमेकास तुफान हाणामारी केली. ऐन वर्दळीच्या रस्त्यावर तरुणांनी राडा घातल्याने बघ्यांची मोठी गर्दी उसळली होती. काही काळ तरुणांच्या मारहाणीच्या राड्यामुळे रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा झाला होता. घटनेची माहिती एमआयडीसी वाळूज पोलिसांना मिळताच पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत हाणामारीचा राडा करणाऱ्या तरुणांना पोलिसांची चाहूल लागताच तरुण घटनास्थळावरून पसार झाले. भर रस्त्यात झालेल्या सिनेस्टाईल हाणामारी घटनेमुळे टवाळखोर आणि गुन्हेगारी तरुणांना पोलिसांचे भय राहिले की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे
