
वाळूजमहानगर, (ता.26) – सहकार मंत्री अतुल सावे यांच्या वाढदिवसानिमित्त लायन्स नेत्र रुग्णालय, लायन्स क्लब वाळूज व के.पी. सेल्स कॉर्पोरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन रविवारी (ता.26) करण्यात आले होते. यात परिसरातील 230 जणांनी नेत्र तपासणी करून घेतली.

बाजाजनगर येथील मोहटादेवी मंदिर परिसरात सकाळी 8 ते 1 वाजे दरम्यान घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन के.पी. सेल्सचे सीईओ जयराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपाचे तालुका अध्यक्ष वसंत प्रधान, मोहटादेवी मंदिराचे कोषाध्यक्ष प्रभाकर बडे, संभाजी चौधरी, यमराज गिरी, सतीश पाटील, गजानन नांदूरकर, अमित चोरडिया, संजय कातकडे, प्रकाश काची, दिनेश राऊत, लायन्स क्लब वाळूजचे अध्यक्ष अशोक भालेकर, जितेंद्र महाजन, महेश कुमार दिमते, नितीन जाधव, विष्णू खडकर, अनिल पवार, सुनील धुमाळ, अतुल कुलकर्णी, नितीन पणभिसरे, संजय पणभीसरे, सिद्धार्थ दिपके, शंकर ढेपे आदींची प्रमुख उपस्थिती होती. या शिबिरात लायन्स नेत्रालयाचे योगेश निकाळजे, मुश्ताक शेख, एस एस गायकवाड, मंगेश देशमुख आदी उपस्थित होते. या शिबिरामध्ये जवळपास 230 जणांनी लाभ घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोहनसिंग सलामपुरे मित्र मंडळ, पहिलवान बिरजुभैया युवा मंच यांनी परिश्रम घेतले.
