
वाळूजमहानगर, ता.16 – दिव्यांगाचे स्नेहमिलन व दिव्यांग आधार व पुनर्वसन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे उद्घाटन बजाजनगर येथे शुक्रवारी (ता.15) रोजी दिव्यांग प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी गाडे यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योगपती बालाजी शिंदे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून योगेश पाटील, चंद्रकला शिंदे, सुरेखा भन्साळी होत्या. कार्यक्रमास बजाजनगर येथील विविध सामाजिक संस्थांचे अध्यक्ष तसेच दिव्यांग बंधू आणि भगिनी आवर्जून उपस्थित होत्या. यावेळी बालाजी शिंदे यांनी दिव्यांगांना वेगवेगळ्या कंपनीमध्ये रोजगार देण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी दिव्याग आधार व पुनर्वसन संस्थेचे अध्यक्ष दत्ता वाकडे यांनी दिव्यांगाच्या समस्या व संस्थेमार्फत केले जाणारे कार्य यांची सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती केशव ढोले, रूपचंद अग्रवाल, विजय गव्हाणे, डॉ.संजय काळे, निलेश भारती, कृष्णा गुंड, हर्षल जाधव, सुनील उस्के, डॉ. महादेव संकपाळ, पी एस.गुजर, शरद गहिले व परिसरातील दिव्यांग बांधव भगिनी उपस्थित होत्या. संस्थेचे उपाध्यक्ष पारसचंद साकला, सचिव विष्णुदास पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तर शिवाजी दांगटराजे यांनी आभार मानले.
संस्थेचे कोषाध्यक्ष किशोर फेगडे, सहसचिव पिराजी धडेकर, सदस्य शिवाजी दांगट, बद्रीनाथ लघाने, गणेश आहेर, विठ्ठल भवर या संस्थेच्या सदस्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी परिश्रम घेतले.
